आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egypts Delegates Walk Out At African Sport Event After Belly Dance

क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनसोहळ्यात बॅले डान्स पाहून अधिकारी नाराज; म्हणाले, अचरट प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहिरा - आफ्रिकेतील एका फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बॅले डान्स सादर करण्यात आला असताना इजिप्तचे अधिकारी कार्यक्रमातून उठून गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात असा डान्स सादर केल्यामुळे अधिकारी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काहिरामध्ये आफ्रिका फुटबॉल संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात इजिप्तची प्रसिद्ध बॅले डान्सर दीना तलत सैय्यद मोहम्मदने सादरीकरण केले. तलतच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन मिनीटांच्या या क्लिपमध्ये तलत चमकदार भडक रंगाच्या कपड्यांमध्ये बॅले डान्स करताना दिसते. (शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ)
या कार्यक्रमाला इजिप्तचे युवक आणि क्रीडा मंत्री खालिद अब्देल अजीज देखील उपस्थित होते. इजिप्तच्या फुटबॉल संघाच्या प्रवक्त्याने सांगितले, की बॅले डान्स सुरु झाल्यानंर अनेक अधिकारी उठून गेले. एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये असा अचरट डान्स सादर झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तसेच ते नाराज झाले.
इजिप्तच्या स्टेट टेलिव्हिजन चॅनेलची अँकर सोहा इब्राहिमने सोशल मीडियावरील टिप्पणीवर बॅले डान्सरचा परफॉर्मन्स सार्वजनिक ठिकाणी करण्यासारखा नसल्याचे म्हटले आहे, तर तलत या सर्व वादापासून अनभिज्ञ आहे.
गल्फ न्यूच्या वृत्तानुसार ती म्हणाली, 'त्या कार्यक्रमात मी एकटीनेच डान्स केला असे नाही. अनेक देशांच्या डान्सर तिथे होत्या. मला इजिप्तचा अभिमान आहे, आणि मी माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केले.'
हा वादग्रस्त उदघाटन सोहळा 6 एप्रिल रोजी झाला, याला फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लॅटर देखील उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तलतच्या परफॉर्मन्सचे PHOTOS शेवटच्या स्लाइडवर VIDEO