आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाकिस्तानपासून मलेशियापर्यंत अशी सुरू आहे ईदची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये खरेदीसाठी पोहोचलेली महिला. - Divya Marathi
मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये खरेदीसाठी पोहोचलेली महिला.
रमजानचा पवित्र महिना काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे जगभरात ईदच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि अफगानिस्तानपासून ते पाकिस्तानपर्यंत ईदसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. जगभरात ईदगाह आणि मशिदींमध्ये स्वच्छता आणि सजावटीच्या कामाला वेग आला आहे. तसेच बाजारातही ईदसाठी खास प्रकारच्या मिठाई तयार केल्या जात आहेत. तसेच कपडे खरेदीसाठीही चांगलीच गर्दी झालेली दिसत आहेत.

एका महिन्याच्या उपासनेनंतर मुस्लीम धर्मियांसाठी ईद हा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो. दक्षिण आशियाच्या देशांमध्ये ही ईद छोटी ईद म्हणून साजरी केली जाते. तर तुर्कस्तानमध्ये ती रमजान बयरामीच्या स्वरुपात साजरी होते. पण सर्वच ठिकाणी मुस्लीम समुदायासाठी हा मोठा उत्सव असतो.

ईदसाठी मुस्लीम बांधव नव्या कपड्यांच्या खरेदी आणि सजावटीमध्ये व्यस्त आहेत. तसेच ईदचा उत्सव कुटुंबाबरोबर साजरा करण्यासाठी अनेकांनी आपापल्या गावाकडे निघायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक, विमानतळांवरही गर्दी पाहायला मिळत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरात सुरू असलेल्या तयारीचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...