आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफेल टाॅवर खिसेकापूंमुळे बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - आग्य्रातील ताजमहाल आणि त्याच्या जवळपासच्या भागात खिसेकापूंनी लुटल्याचे व स्थानिकांनी फसविल्याचे अनेक किस्से नेहमीचेच आहेत. मात्र, पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरभोवतीदेखील हीच समस्या आहे. १२५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला हा मनाेरा पाहण्यासाठी दरराेज सुमारे २५ हजार पर्यटक जातात. तेथे खिसेकापूंचे प्रताप इतके वाढले आहेत की टाॅवरची देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शुक्रवारी टाॅवरलाच कुलूप ठाेकले. एक दिवस संप केला.

तेथील तिकीटघर आणि इतर विभागांमध्ये सुमारे ३०० कर्मचारी आहेत. त्यांची मागणी आहे की, जाेपर्यंत व्यवस्थापन पाहणारी कंपनी व पॅरिसचे पोलिस या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्याची हमी देत नाहीत, ताेपर्यंत ते काम बंदच ठेवतील.

या समस्येबद्दल बाेलताना एक कर्मचारी म्हणाला, ‘टाॅवरच्या संपूर्ण स्टाफसाठी ही शरमेची बाब आहे. जगभरातील पर्यटक येथे येतात. अनेक जण तर जीवनभर जमा केलेली रक्कम खर्च करून येथे येण्याचे स्वप्न पूर्णत्वास आणतात, खिसेकापू त्यांना लुटतात, सामानही लांबविले जाते. लुटले गेलेेले पर्यटक आमच्याकडे मदत मागण्यासाठी येतात, तेव्हा लाज वाटते. आम्ही काेणाला पकडण्याचा प्रयत्न केला तर हे चाेरटे आम्हालाही मारहाण करतात. टाॅवरच्या जवळच ३०-४० खिसेकापू फिरत असतात. त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला तर म्हणतात - तुम्ही आम्हाला काम का करू देत नाही? संपूर्ण पॅरिसमध्येच ही समस्या इतकी भयावह आहे की, हंगामात २६ हजारांहून अधिक पाेिलस व एजंट खिसेकापूंना पकडण्याच्याच माेहिमेवर असतात.
बातम्या आणखी आहेत...