जर्मनीच्या बेव्हेरिया प्रांतातील गार्मिश्च-पार्टेनकिर्चेन शहरात रविवारपासून जी-७ परिषदेच्या विरोधात शनिवारी सुमारे ८ हजार निदर्शक रस्त्यावर उतरले होते या वेळी झटापटीत शेकडो आंदोलक जखमी झाले. दोन दिवसांच्या परिषदेत जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, इटली, कॅनडा, जपान या देशांचे प्रमुख नेते वातावरण बदल, जागतिक पातळीवर भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठीउपाययोजना, अमेरिका-युरोप व्यापारी करार आदी विषयांवर विचारविनिमय करतील. रशियाकडून युक्रेनच्या ताब्याचा मुद्दाही गााजण्याची शक्यता आहे.
विरोध कशासाठी ?
जी-७ मधील सदस्य राष्ट्र केवळ बँक आणि भांडवलदारांच्या हिताचाच विचार करतात. त्यामुळे हे धोरण व्यापकदृष्ट्या अयोग्य अाहे.