आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Donald Trump, Hillary Clinton Win Big In New York

न्यूयॉर्कच्या बालेकिल्ल्यात हिलरी क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्पही विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन यांनी आपल्या घरगुती मैदान असलेल्या न्यूयॉर्क प्रायमरी निवडणुकीत विजय संपादन केला. या विजयामुळे दोन्ही नेते राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होण्याच्या आणखी जवळ पोहचले आहेत.
अब्जाधीश उद्योगपती ट्रम्प यांनी मूळ राज्यात मोठा विजय मिळवला. त्यांना जवळपास ९५ सदस्यांचा कौल मिळाला आहे. हिलरी यांनीदेखील आपल्या विजयातून डेमोक्रॅटिकचे दुसरे प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांना खूप पिछाडीवर टाकले आहे. न्यूयॉर्क प्रायमरी निवडणुकीत गोंधळ झाल्या असल्याच्याही काही तक्रारी आहेत. न्यूयॉर्क सिटी मतदारांच्या यादीतून १ लाख २५ हजार नावे गायब असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी स्कॉट स्ट्रिंगर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढच्या टप्प्यात डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन दोन्हींसाठी पेन्सिल्व्हेनियातील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. न्यूयॉर्कमध्ये पराभूत झाल्यामुळे सँडर्स तातडीने पेन्सिल्व्हेनियाकडे रवाना झाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सध्याची स्थिती