आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या निवडणुकीत ओबामांचे रणनीतिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बराक ओबामा यांना विजय मिळवून देणारे धोरणकर्ते आता ब्रिटनच्या निवडणुकीतही हे काम करणार आहेत. विशेष म्हणजे सत्तारूढ आणि विरोधी पक्ष दोघांनीही ही सेवा घेतली असल्यामुळे त्याचा कोणाला फायदा होईल, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. कंझर्व्हेटिव्ह पंतप्रधान डेव्हिड कॅमरूनना त्यांचे लेबर पक्षाचे प्रतिस्पर्धी मिलिबँड तुल्यबळ लढत देत आहेत.
मिलिबँड यांनी डेव्हिड एक्सेलराॅड या निवडणूक रणनीती तज्ज्ञाची सेवा घेतली आहे. हे ६० वर्षांचे असून ओबामा यांच्या यस वूई कॅन घोषणेमागे त्यांचाच हात असल्याचे सांगण्यात येते. ओबामा याच घोषणेमुळे २००८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले होते. पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी ४६ वर्षाच्या जिम मेसिना यांची सेवा घेतली आहे. मेसिना यांनी ओबामांच्या २०१२ च्या निवडणूक प्रचाराचे प्रमुखपद सांभाळले होते. कॅमरून यांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे खासगी सहकारी राहिलेले रॅगी लव्ह यांचीही सेवा घेतली आहे. रॅगी ३३ वर्षांचे असून बॉडी मॅन नावाने लोकप्रिय आहेत.

युरोपीय संघ विरोधी राजकीय पक्ष यूके इंडिपेंडंट पार्टीचे(यूकेआयपी) नेते निगेल फराग म्हणाले, अमेरिकी रणनीतिकार ब्रिटिश निवडणुकीचे वातावरण बिघडून देतील. त्यांच्याकडून नकारात्मक, घाणेरडा आणि वैयक्तिक पातळीवर प्रचार करतील.
एक्सेलरॉड म्हणाले, मिलिबँड वैचारिक नेते

एक्सेलरॉड म्हणाले की, मिलिबँड वैचारिक आणि दूरदृष्टी असणारे प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळे त्यांनी मिलिबँडची निवड केली आहे. मिलिबँड यांना विरोधकांनी सामान्य मतदारांपासून दूर राहणारे नेते ठरवले आहे. मात्र, विरोधकांच्या चौफेर हल्ल्यानंतरही मिलिबँड यांची आपल्या विचाराने आणि व्हिजननुसार वाटचाल सुरू आहे.