आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक विमान लांब पल्ल्यासाठी सज्ज, इंग्लिश खाडीत यशस्वी चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालैस (फ्रान्स) - जगातील पहिल्याच इलेक्ट्रिक विमानाची गुरुवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. इंग्लिश खाडीत हा प्रयोग करण्यात आला. फ्रेंच पायलटने विमानाच्या क्षमतेचा नमुना सादर केला. त्यामुळे लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी हे विमान आता सज्ज असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

हॉगस डुवाल असे पायलटचे नाव आहे. विमानाने फ्रेंच बंदराहून यशस्वी उड्डाण करून इंग्लिश खाडीचा प्रदेश पूर्ण पार केला. दोन इंजिन आणि एक आसनी असलेल्या छोटेखानी विमानाची ही चाचणी यशस्वी ठरली आहे. त्याशिवाय शुक्रवारी सकाळी दोन आसनी ई-फॅन नावाच्या इलेक्ट्रिक विमानाचे केंट ते कालैस दरम्यान उड्डाण घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खाडीतून विमानाने दीर्घ पल्ला पूर्ण सहजपणे गाठल्यामुळे हा आपल्यासाठी निश्चितच दिलासा देणारा आणि महत्त्वाचा असा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया डुवाल यांनी दिली. दक्षिण इंग्लंड ते उत्तर फ्रान्सपर्यंतच्या भागातील सागरी क्षेत्राला इंग्लिश खाडी म्हटले जाते. हे सागरी क्षेत्र पुढे अॅटलांटिक सागरापर्यंत जाऊन मिळालेले आहे.

१९०९ मध्ये फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअटने पहिल्यांदा इंग्लिश खाडीतून केले विमान उड्डाण.
७५, ००० चौरस किलोमीटर इंग्लिश खाडीचे सागरी क्षेत्र

अनेक कंपन्या उत्सुक
विविध देशांतील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. त्याशिवाय प्रदूषण आणि इंधनरहित विमानाचा पर्याय म्हणून जग त्याकडे पाहू लागले आहे.

थ्री-डी प्रिंटरच्या साह्याने उडी मारणारा यंत्रमानव
वॉशिंग्टन । थ्री-डी प्रिंटरच्या साह्याने उडी मारणारा यंत्रमानवाची निर्मिती करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. रोबोटमध्ये ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे. रोबोटच्या निर्मितीसाठी अतिशय मऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रोबोटची नवी पिढी तयार करण्यात यश मिळाले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक मायकल टॉली यांनी केला आहे. त्याशिवाय बॅटरीदेखील आहे.