आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Price Hike, Japan Starts Nuclear Project

वीज महागली, जपानचे घूमजाव, पुन्हा सुरू केला आण्विक प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - २०११ मध्ये फुकूशिमा किरणोत्सर्गाच्या दुर्घटनेनंतर जपानने आण्विक प्रकल्पाबाबत कानाला खडा लावला होता. २०१३ पर्यंत देशातील सर्व आण्विक प्रकल्प बंद झाले होते. परंतु दोन वर्षांनंतर देशाने घुमजाव करून ते पुन्हा सुरू केले आहेत. सतुसुमसेंदई येथील कानसेई प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पंतप्रधान शिंजो अॅबे म्हणाले, कमकुवत अर्थव्यवस्थेवर हाच एकमेव तोडगा असू शकतो. इतर मार्गांनी वीज महाग पडू लागली आहे. परंतु जनतेने मात्र सार्वमतामध्ये या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही महागडी वीज खरेदी करू. परंतु अणुऊर्जा प्रकल्प नको, असे जनतेने म्हटले आहे. ८९० मेगावॉटच्या या प्रकल्पात १५७ फ्युएल लॉड लावण्याचे काम शुक्रवारपर्यंत चालणार आहे.

११ मार्च २०११ रोजीची घटना
११ मार्च २०११ रोजी जपानमध्ये रिश्टर स्केलवर ९ तीव्रतेचा भूकंपा झाला. सुनामीच्या तडाख्यानंतर फुकूशिमाच्या दाइची आण्विक प्रकल्पात महाकाय लाटा घुसल्या. क्षारयुक्त पाण्याने सयंत्रे वितळू लागली व स्फोट झाले. नंतर किरणोत्सर्ग होऊन हजारो लाेकांवर विस्थापित होण्याची वेळ आली.

सरकारने यामुळे केला वचनभंग
फायदा आण्विक वीज खूप स्वस्त आहे. दर महिन्याला ११६४ कोटी रुपये वाचवता येऊ शकतील. त्यात ३८१ कोटी रुपयांचा कोळसा आणि ७८३ कोटी रुपयांचे तेल आणि एलएनजीची बचत होईल.
नाइलाज आण्विक प्रकल्प बंद झाल्यामुळे विजेचे कमी उत्पादन होत आहे. वीज संकट वाढू लागले आहे. दर महिन्याला २४८ अब्ज रूपयांचा फटका बसू लागला आहे. त्यात अर्थव्यवस्था अधिकच डबघाईला येऊ लागली आहे.

पुढे वाचा.. रोबोटने आण्विक कच-याची साफसफाई