आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Surrogacy : बहिणीच्या पोटी भावंडांचा जन्म, ही गुंतागुंत वाचून चक्रावेल डोकं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नात्यांमधील गुंतागुंत कशी असते ते पाहायचे असेल तर अॅलन बाऊन यांच्याशिवाय चांगले उदाहरण असू शकत नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 46 वर्षीय अॅलन तीन मुलांच्या आई आहेत. त्या आई जेनी आणि सावत्र वडील टोनी यांच्याबरोबर राहते. पण त्यांच्यातील नाते एवढे साधेही नाही. तीन मुलांपैकी अॅलन केवळ एका मुलीची अधिकृत आई आहे. तर उर्वरीत जुळ्या मुलांवर अॅलनची आई जेनी आणि सावत्र वडील टोनी यांचा अधिकार आहे.

या नात्याची कथा सांगायची झाल्यास, अॅलनच्या आईने तिच्या वडीलांना सोडून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर विवाह केला होता. त्यानंतर तिची आई आणि नवीन वडिलांची मुलांना जन्म देण्याची इच्छा होती. पण वय अधिक असल्याने ते मुलांना जन्म देऊ शकत नव्हते. त्यामुळे अखेर अॅलनने तिच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आयव्हीएफ तंत्राची मदत घेतली. त्याद्वारे तिने वडिलांच्या शुक्राणुंचा वापर करून गर्भधारणा केली. त्यातून तिला जुळी मुले (मुलगा अॅलेक्स आणि मुलगी रूथ) झाली. ते दोघे आज 12 वर्षांचे आहेत. अॅलनने त्यांना जन्म दिला असला तरी, जेनी आणि टोनीने दोघांना अदिकृतरित्या दत्तक घेतले आहे.

नात्यांची गुंतागुंत...
आता जरा याचाही विचार करता. अॅलनची पहिली मुलगी मॅडी 17 वर्षांची आहे. त्यानंतर अॅलनने सरोगसीद्वारे रूथ आणि अॅलेक्स यांना (12 वर्ष) जन्म दिला. त्यामुळे रूथ आणि अॅलेक्स, मॅडीचे लहान भाऊ, बहीण ठरतात. पण टोनी है जैविकदृष्ट्या त्यांचे वडील आहेत. त्यामुळे हे दोघे मॅडीचे नात्याने मामा आणि मावशीही लागतात. तसेच अॅलनची आई जेनी आणि वडील टोनी या जुळ्या मुलांचे अधिकृत आई वडील आहेत, त्याचबरोबर ते त्यांचे आजी-आजोबाही आहेत. तर जन्मदाती अॅलन जुळ्या मुलांची आई आणि दुसऱ्या नात्याने बहीणही ठरते.

चर्चेत असण्याचे कारण...
गेल्या महिन्यात ब्रिटनच्याच अॅन आणि मेरी कॅसन यांनी समलैंगिक संबंधातून मुलांना जन्म दिला होता. त्यांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे त्यांच्या गे मुलाचे शुक्राणू घेऊन दुसऱ्या एका महिलेच्या मदतीने बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या घटना अनैतिक असल्याचा वाद सुरू झाला होता. सरोगेसी आणि फर्टिलिटीशी संबंधित कायद्यांचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या नात्यांत काही चुकीचे नसल्याचे अॅलन म्हणते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कुटुंबाचे काही PHOTOS