आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Email Reviles That Hilary Wants To Target Pakistani Officers

पाकचे लष्करी अधिकारी लक्ष्य; क्लिंटन यांचा इरादा, ई-मेल उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अल कायदा आणि तत्सम इतर संघटनांना छुपा पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करावे, असा प्रस्ताव अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या विचाराधीन होता. त्यांना मिळालेला ई-मेल उजेडात आल्यानंतर हा गौप्यस्फोट झाला आहे.

तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सॅम्युएल रिचर्ड ‘सँडी’ बर्गर यांनी मेल पाठवून स्वराज यांना हा सल्ला दिला होता. ३ ऑक्टोबर २००९ अशी तारीख या ई-मेलवर आहे. बर्गर हे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे सल्लागार होते. त्यांनी या पदावर १४ मार्च १९९७ ते २० जानेवारी २००१ पर्यंत काम पाहिले. मंगळवारी ही माहिती उजेडात आली. अल कायदाला सहकार्य करणाऱ्या लष्करातील अधिकाऱ्यांना लक्ष्य केले गेले पाहिजे. त्यानंतरच दहशतवादाच्या विरोधातील प्रयत्न यशस्वी ठरतील, असे मला वाटते. आपले गुप्तहेर खाते सक्षम आहे. आपण बँकांच्या माध्यमातून त्यांच्या नाड्या आवळल्या पाहिजेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या प्रवासावरही निर्बंध घालता येऊ शकतील. पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचेही मूल्यमापन व्हायला हवे. पाकिस्तानी नागरिकांमध्ये त्यामुळे अमेरिकेविषयी संशय निर्माण होऊ शकतो, असेही सॅम्युएल यांनी सांगितले.

भारताचाही उल्लेख
अमेरिकेने मंगळवारी परराष्ट्र विभागाशी संबंधित हजारो वादग्रस्त ई-मेल जाहीर केले. त्यात भारताचाही उल्लेख असलेल्या मेलचा समावेश आहे. परंतु त्यात वादग्रस्त असे काहीही नाही. केवळ क्लिंटन यांच्या २००९ च्या भारत दौऱ्याचा उल्लेख त्यात आढळतो.

क्लिंटन यांच्या खासगी सर्व्हरवरून वाद
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर विरोधकांनी आरोप केले. क्लिंटन यांनी परराष्ट्र खात्याच्या ई-मेलऐवजी खासगी ई-मेल सर्व्हरचा वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर सरकारने ५० हजारांवर मेल उघड करण्याचा निर्णय घेतला होता.