आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emergency In Baltimore City In America After Death Of Black Person

अमेरिका: बाल्टिमोरमध्ये अश्वेत तरुणाच्या मृत्यूनंतर हिंसाचार, आणीबाणी लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क (अमेरिका)- आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या प्रचंड हिंसाचारात 15 पोलिस जखमी झाले. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी आग लावली आहे. अनियंत्रित जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर आणि पेपर बॉल्सचा वापर करण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने मेरीलॅंडचे गर्व्हनर लॅरी होगन यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे.
25 वर्षीय फ्रेंडी ग्रे याचा पोलिस कोठडीत रहस्यमय मृत्यू झाला आहे. त्याच्या पार्थिवाववर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिस कोठडीत त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याला मुद्दाम ठार मारले असल्याचा आरोप जनतेने केला आहे. एकिकडे पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांवर बळाचा वापर करु नये, यावर देशभरात चर्चा सुरु असताना दुसरीकडे अश्वेत नागरिकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. तो आफ्रिकी-अमेरिकी ग्रे नागरिक होता.
जनतेच्या आंदोलनाबदद्ल कॅप्टन एरिक कोवलजेक म्हणाले, की लोकांच्या हिंसाचारात सात पोलिस अधिकाऱ्यांना दुखापत झाली आहे. काहींना हाडांवर जखमा झाल्या आहेत. एक अधिकारी बेशुद्ध पडला आहे.
एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या फुटेजमध्ये पोलिसांच्या कारला आगीत जळताना दाखविले आहे. उग्र जमावाचे लहान-मोठे समुह दुकान आणि मॉल्स लुटत असल्याचेही या फुटेजमध्ये दिसून येत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, बाल्टिमोर शहरात सुरु असलेला हिंसाचार... त्यानंतर पोलिस कारवाई....