आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emergency Landing Of Airplane Of Polish Flight After Bomb Threat

बॉम्बची धमकी, पोलंडहून इजिप्तला जाणा-या विमानेचे बुल्गेरियात इमर्जंसी लँडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया (बुल्गेरिया) - पोलंडच्या वारसॉहून इजिप्तच्या हुर्गादाला जाणाऱ्या एका विमानाचे बुल्गेरियात इमर्जंसी लँडिंग करण्यात आले. बॉम्बच्या धमकीनंतर बुर्गासा एअरपोर्टवर विमान उतरवावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. लँडिंगनंतर लगेचच विमान रिकामे करण्यात आले आहे. विमानाची तपासणी केली जात असून, फ्लाइट क्रमांक LLP8015 मध्ये 161 प्रवासी होते.

काय म्हणाले व्यवस्थापन?
बुर्गासचे मेयर दिमित्री निकोलोव्ह यांनी सांगितले की, सकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) विमानाचे लँडिंग करण्यात आले. ते म्हणाले, विमान एअरपोर्टवर उतरताच सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. संपूर्ण तपासणीनंतर पुन्हा उड्डाणाला परवानगी दिली जाणार आहे.

कोणी दिली माहिती...
प्राथमिक माहितीनुसार एका 64 वर्षीय प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. मात्र तपासात आतापर्यंत बॉम्ब आढळलेला नाही. पॅरिस हल्ल्यानंतर युरोपीय देशांमध्ये चांगलीच सतर्कता आहे. बुधवारीही एअर फ्रान्सच्या दोन फ्लाइट्स बॉम्बच्या धमकीनंतर डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या.

संशयिताने विमानतळावरही केला होता बॉम्बचा उल्लेख
Rmf24.pl या संकेतस्तळानुसार एका पॅसेंजरने सांगितले की, एअरपोर्टवरही तो व्यक्ती, त्याच्याकडे बॉम्ब असेल तर काय होईल, असे म्हणाला होता. इमर्जंसी लँडिंगच्या एका तासानंतर अँटि-टेररिस्ट फोर्स विमानात आले त्यांनी बॉम्बबाबत विचारणा केली. त्यांनी सर्व पॅसेंजर्सना हात वर करण्यास सांहितले तसेच संशयिताला ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांनी सांगितले की, आम्ही एकेकाला विमानातून खाली उतरण्यास सांगितले. आम्ही सामानाची तपासणी केली. अफवा पसरवणारा व्यक्ती दारु प्यायला आहे का? याची माहिती घेतली जात असल्याचेही तो म्हणाला.

इजिप्तमध्ये ISIS ने पाडले होते रशियन विमान
31 ऑक्टोबरला इजिप्तमध्येच दहशतवादी संघटना ISIS ने रशियन िवमान पाडले होते.