आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emily Loose 82 Kg After Being Humiliated By The Incident

टोमण्यांमुळे होती त्रस्त, 145 वरून 63 किलो वजन करून बनली Fit

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एमिली केस) - Divya Marathi
(एमिली केस)
केंट - स्थूलपणामुळे त्रस्त असणारे अनेक लोक आहेत. विविध प्रकारचे व्यायाम आणि अगदी ऑपरेशन करूनही वजन कमी होत नसल्याच्या समस्यांनी ते त्रस्त आहेत. इंग्लंडच्या फोकस्टोन सिटीत राहणारी एमिली केस हीदेखिल अशीच एक तरुणी. तिचे वजन आधी 145 किलो होते. पण सर्जरीनंतर एमिलीचे वजन 82 किलोने घटले. सध्या ती अगदी Fit आहे.

एमिलीच्या मते, ती आधी बरीच सडपातळ होती. त्यावेळी आई तिला हेल्दी फूड खाऊ घालत होती. पण 13 व्या वर्षानंतर वजन वाढू लागले होते. 17 व्या वर्षांपर्यंत ती चांगलीच स्थूल बनली. अनेक प्रयत्न करूनही तिला वजन कमी करण्यात यश मिळत नव्हते. त्यामुळे अखेर तिने तसेच जीवन स्वीकारले. आपण वजन कमी करुच शकणार नाही याची तिला खात्री झाली. पण एक दिवस काही मुलांनी मारलेल्या टोमण्यांमुळे तिला वजन कमी करायला भाग पाडले.

व्यवसायाने नेल टेक्निशियन असलेली एमिली सांगते की, रस्त्याच्या कडेने चालताना कारमधून जाणाऱ्या काही मुलांनी तिला 'ओए फॅटी' असे म्हणत चिडवले. हा प्रकार फारच अपमानकारक होता. त्यामुळे तिला खूप दुःख झाले. त्यानंतर तिने पुन्हा वजन कमी करण्यासाठी व्यायाम सुरू केले. याचदरम्यान तिने वजन कमी करण्यासाठी सर्जरीही केली. त्यानंतर तिचे वजन बरेच कमी झाले. सध्या ती पूर्णपणे फिट बनली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, एमिलीचे काही आणखी PHOTOS