आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉकपिटमध्ये धूर, ५०० प्रवासी थोडक्यात बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - सिडनीहून दुबईला जात असलेल्या अमिरात एअरबसच्या ए-३८० विमानाच्या कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्याने त्याची कोलंबो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. त्यामुळे यातून प्रवास करणारे ५०० प्रवासी थोडक्यात बचावले. श्रीलंकेच्या एअरपोर्ट चीफ एअर नेव्हिगेशन सर्व्हिसचे अधिकारी क्रिशांती टिसेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमधून धूर निघत असल्याची सूचना वैमानिकांनी कोलंबोच्या विमानतळास देत आपत्कालीन लँडिंग करण्याविषयी सांगितले.

विमान धावपट्टीवर उतरताच त्यातील ४७१ प्रवासी, ६ बालके आणि ३० कर्मचार्‍यांना ताबडतोब विमानातून बाहेर काढण्यात आले. चालक दलातील कर्मचारीही सोबतच आहेत. प्रवाशांना दुसर्‍या विमानाने रवाना करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...