आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन बँकिंगसाठी आता इमोजिसची सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ऑनलाइन बँकिंग आता अधिक सुरक्षित होणार असून चारअक्षरी पिनकोडच्या जागी इमोजींचा वापर होऊ शकेल. इमोजी म्हणजे विविध भाव असलेल्या व्यंगात्मक प्रतिमा होय. यासाठी ब्रिटनची इंटेलिजंट एन्व्हाॅयर्नमेंट कंपनी प्रयत्न करत आहे.

आकड्यांपेक्षा विविध हावभाव असलेल्या ४४ इमोजिस पासवर्डच्या रूपात अधिक सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला. सायबर सुरक्षातज्ज्ञ प्रा.अॅलन वूडवर्ड म्हणाले, काही कंपन्यांनी यापूर्वीच पॅटर्न्स छायाचित्रांचा पासवर्डच्या रूपात प्रयोग केलेला आहे. इमोजीचे पासवर्ड हॅक करणे जवळपास अशक्य असेल.