आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emotional Conversation Between Father And Son After Paris Attack

VIDEO : .. ते आपल्याला गोळ्या घालतील, बापलेकाच्या संभाषणात पॅरिसमधील दहशत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस हल्ल्याने अगदी चिमुरड्यां जीवांच्या हृदयावरही जखमा केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या एका बाप लेकाच्यादरम्यान झालेल्या हृदयस्पर्शी संवादावरून आपल्याला याचा प्रत्यय येतो. त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 17 नोव्हेंबरला यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 80 हजारपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. बापलेकांमध्ये नेमके काय बोलणे झाले हे आपण पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घेऊ. त्याचा व्हिडीओही तुम्ही पाहू शकता, पण तो वेगळ्या भाषेत असल्याचे त्यांचे संभाषण स्लाइड्सच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत.
संभाषणाचा अंश...
मुलगा - आपण सावध राहायला हवे, आपल्याला घर बदलावे लागेल.
वडील - चिंता नको करू, आपल्या कुठेही जायची गरज नाही, फ्रान्स आपले घर आहे.
मुलगा (गोंधळून) - पण ते लोक फार वाईट आहेत, बाबा.
वडील हो पण असे लोक सगळीकडे असतात.
मुलगा - त्यांच्याकडे बंदूक आहे. ते आपल्याला गोळी मारतील.
त्यावर वडील म्हणाले, त्यांच्याकडे बंदूक असेल तर आपल्याकडे फूल आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या बापलेकांमध्ये झालेली चर्चा...