आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचे नागरिक सुलभ हप्त्याने खरेदी करत आहेत अंत्यविधीसाठी जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंस्टॉलमेंटद्वारे खरेदी ही भविष्याची तयारी असते. म्हणजे छोट्या छोट्या हप्त्यांच्या रकमेतून घर घेणे, आरोग्य विमा किंवा इतर विमा याचा त्यात समावेश असतो. पण इंग्लंडचे लोक तर जिवंतपणीच स्वतःच्या अंत्यविधीची तयारी करताना दिसत आहे. या ठिकाणी लोक स्वतःच्या अंत्यविधीसाठी हप्त्याने जागा खरेदी करत आहेत. महागाईमुळे अंतिम क्षणी समस्या उद्भवू नये म्हणून ते अशा प्रकारची काळजी घेत आहेत.

इंग्लंडमध्ये अंत्यविधी हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. सरकारी संस्थांच्याशिवाय येथे खासगी कंपन्याही हे काम करतात. त्यांना फ्यूनरल सर्व्हीस फर्म म्हणतात. बहुतांश लोकांना हे जग सोडून गेलेल्या व्यक्तिला चांगल्या प्रकारे निरोप देण्याची इच्छा असते. त्यामुळे ते सरकारी एजंसीऐवजी खासगी संस्थांची निवड करतात. त्या संस्थाच कबरीसाठी जमीन पुरवतात आणि इतर व्यवस्थाही करतात. महागाई आणि जमिनीच्या वाढत्या दरांमुळे बर्मिंघम शहरात खासगी फर्मच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्याचा खर्च सुमारे तीन लाख (2815 पौंड) एवढा येत आहे. एका वर्षापूर्वीपर्यंत हा खर्च 1.84 लाख रुपये होता. लोकांची ही समस्या अनेक विमा आणि अंत्यसंस्काराचे नियोजन करणाऱ्या कंपन्यांसाठी व्यवसाय बनली आहे.

अनेक विमा कंपन्यांनी असे प्लॅन सादर केले आहेत ज्यामध्ये अंत्यसंस्काराचे सर्व विधी आणि कबरीसाठीच्या जागेचा खर्चही कव्हर केला जाणार आहे. त्यासाठी पॉलिसी घेणा-यांना पन्नास हजार ते एक लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ही रक्कम हप्त्यांमध्ये विभागून दिली जाईल. तर फ्युनरल सर्व्हीस देणाऱ्या कंपन्यांनी बेसिक सर्व्हीस, बजेट सर्व्हीस आणि ग्रँड सर्व्हीसच्या नावाने प्लॅन सादर केले आहेत. हे प्लॅन 50 हजारांपासून ते सात लाख रुपयांपर्यंतचे आहेत. लोकांना त्यांच्या बजेटनुसार प्लॅन निवडून हप्त्यांमध्ये विभागून पैसे देता येतील. त्याचप्रकारे काही कंपन्यांनी ‘हायर नाऊ, पे लेटर’ सर्व्हीसही सुरू केली आहे. यात कंपन्या अंत्य संस्काराच्या वेळी पैसे घेणार नाहीत. नातेवाईकांना नंतर ही रक्कम अदा करता येणार आहे.

फ्युनरल सल्लागार डेव्हीड डी सिल्व्हा यांच्या मते, लोकांनी थोडी माहिती मिळवल्यास त्यांना चांगली डील मिळू शकते. पण कोणालाही मृत्यूनंतर लगेचच तसे करणे शक्य होत नाही. लोक दुःखात असतात आणि ते मिळेल त्याची सेवा निवडतात. मात्र थोडी माहिती घेतल्यास किमान एक हजार पौंडपर्यंतची बचत होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...