Home | Sports | From The Field | England team won

लेव्हिसचा सर्वाेच्च स्काेअरवर रिटायर्ड हाेण्याचा 140 वर्षांनंतर विक्रम; इंग्लंड टीम विजयी

वृत्तसंस्था | Update - Sep 29, 2017, 04:58 AM IST

विंडीजचा फलंदाज एविन लेव्हिसने अांतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका सर्वात जुन्या विक्रमाला तब्बल शतकानंतर मागे टाकले. त्याने

 • England team won
  लंडन- विंडीजचा फलंदाज एविन लेव्हिसने अांतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका सर्वात जुन्या विक्रमाला तब्बल शतकानंतर मागे टाकले. त्याने १४० वर्षांनंतर एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या नावे अाता अांतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वैयक्तिक सर्वाेच्च स्काेअरवर रिटायर्ड हर्ट हाेण्याचा विक्रम नाेंदवला गेला. इंग्लंडविरुद्ध चाैथ्या वनडे सामन्यादरम्यान एविन हा १७६ धावांवर रिटायर्ड हर्ट हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ४७ व्या षटकांच्या दरम्यान दुखापत झाल्याने त्याने हा निर्णय घेतला.

  विंडीजच्या मेहनतीवर पाणी
  एविन लेव्हिसच्या (१६५) दीड शतकी खेळीच्या बळावर विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३५६ धावा काढल्या. असा धावांचा डाेंगर रचूनही इंग्लंडने सहजरीत्या लक्ष्य गाठले. पावसामुळे विंडीजच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. डीएलनुसार इंग्लंडने ६ धावांनी सामना जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा निर्णय घेण्यात अाला. यादरम्यान यजमानांनी ३५.१ षटकांत ५ बाद २५८ धावा काढल्या.

  इंग्लंडचा मालिका विजय
  सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या यजमान इंग्लंडने चाैथ्या वनडेत बाजी मारून विंडीजविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली.

  १८७७ चा विक्रम माेडीत
  अाॅस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमॅन यांनी १८७७ मध्ये कसाेटी सामन्यादरम्यान वैयक्तिक १६५ स्काेअररवर रिटायर्ड हर्ट हाेऊन पॅव्हेलियन गाठण्याचा विक्रम रचला हाेता. मागील १४० वर्षांपर्यंत हा सर्वाेच्च धावसंख्येचा विक्रम अबाधित हाेता.

Trending