आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यातील आनंदही असतो स्माइलीच्या आकारासारखा; 16 ते 20, 65 ते 85 वयात सर्वात जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- दैनंदिन जीवनात, वयानुरूप मिळलेला आनंद आयुष्याच्या आलेखावर ‘स्माइली’सारखा असतो. आलेखात तो यू आकारात दिसतो. वयानुरूप त्यात चढउतार येतात. १६ ते २० व ६५ ते ८५ वयाचे नागरिक सर्वाधिक समाधानी असतात. ४५ ते ५५ वयाचे लोक सर्वात कमी आनंदी राहतात. आयुष्यात १६ व्या व ८० व्या वर्षी आनंद परमोच्च शिखरावर असतो. ५० व्या वर्षी तो सर्वात खाली असतो. अमेरिकेच्या नॅशनल  ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चने भारतासह ९७ देशांत १३ लाख लोकांचे मत नोंदवले. डेव्हिड जी. बलँचफ्लॉवर व अँड्रयू ओसवॉल्डने जगातील ७ सर्वेक्षणे समाविष्ट करून हा अहवाल तयार केला.

समाधान हे आनंदाचे सर्वात मुख्य कारण आनंदाचे गुपित समाधानात दडले आहे. यानंतर तो वय व आरोग्यावर अवलंबून ठरतो. मध्यमवयात आनंद कमी होतो. याचे कारण घटस्फोट, नोकरीची चिंता, कुटुंबाला वेळ न देता येणे आदी आहे. तरुणांत शाळा ते पदवी शिक्षणापर्यंत आनंद वाढतो. अविवाहित असणे, नोकरीची चिंता नसणे व शारीरिकदृष्ट्या कार्यरत असणे हे त्यामागचे कारण.

१० बाबी : आनंदावर परिणाम करतात
१. स्वत:ची तुलना इतरांशी करणे.  
२. अपेक्षेनुसार कामे न होणे.  
३. काय होईल याची विवंचना.  
४. ट्रेंडचे मूल्यमापन करणे.  
५. चांगल्यासाठी अंदाज बांधणे.  
६. भूतकाळातील आठवणी.  
७. आपल्या नावीन्याची ओळख.  
८. स्वत:चे स्वत:च मूल्यमापन.  
९. सुविधांची गणना करणे.  
१०. रोजच्या कामाला गुण देणे.

असे केले संशोधन
संशोधकांनी जगभरातील विशेष ट्रेंड्सचे ऑनलाइन आकलन केले. सरकारी व बिगरसरकारी अहवालाचा अभ्यास केला. काही देशांमध्ये एक समान व तरंगासारखा आनंद पाहावयास मिळाला.
बातम्या आणखी आहेत...