आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियात किरकोळ घटनेला वांशिक वळण, चिनी लोकांना विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- मलेशियात मोबाइल चोरीची एक क्षुल्लक घटना अक्राळविक्राळ बनली असून हा एक राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. पंतप्रधान नजीब रझाक यांना त्यावर केवळ वक्तव्य देऊनच थांबता आलेले नाही तर त्यांच्यावर इशारा देण्याचीही वेळ आली आहे.

क्वालालंपूरच्या एका शॉपिंग मॉलमध्ये ११ जुलैची चोरीची किरकोळ घटना या आकांडतांडवामागील कारण ठरली आहे. मलय वंशाच्या दोन चोरट्यांनी एका दुकानातून मोबाइलची चोरी केली. हे दुकान चिनी नागरिकाच्या मालकीचे होते. चोरीनंतर एकाला अटक करण्यात आली; परंतु दुसरा पळून गेला व तो आपले अनेक साथीदार घेऊन पुन्हा तेथे दाखल झाला. या जमावाने चिनी वंशाच्या दुकानदारांशी मारहाण केली.

मारहाणीचा इति वृत्तांत शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने व्हिडिआेद्वारे फेसबुकवर पोस्ट केला. तो काही वेळात ८ लाख वेळा शेअर झाला. त्यावर सोशल मीडियावर चिनी समुदायाच्या विरोधात मतांचा पूरच आला. हा चिनी समुदायाकडून केला जाणारा वर्णभेद असल्याचा आरोप करण्यात आला. चीनमधून आलेले लोक मलय समुदायापेक्षा अधिक कमाई करतात व त्यांच्यामुळे स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळण्यात अडथळे येऊ लागले आहेत.
घटनेनंतर १३ जुलै रोजी मॉलच्या बाहेर स्थानिक लोकांनी तोडफोड केली. पोलिसांनी निदर्शकांना अटक केली होती.
घटनेकडे गुन्हेगारी कृत्य म्हणून पाहिले पाहिजे. त्याकडे वर्णभेदाची समस्या म्हणून पाहिले जाऊ नये. गर्दीची मानसिकता लक्षात घेऊन खबरदारी ठेवली पाहिजे, असे पंतप्रधान रजाक यांनी म्हटले आहे. फेसबुकवर त्यांनी हा इशारा दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...