आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात लॅपटॉप-टॅब्लेटवर बंदी आणण्याचा युरोप-अमेरिकेचा विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोक्याच्या नव्या इशाऱ्यानुसार, जगभरातील वर्दळीच्या विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी कंझ्युमर डिव्हाइसमध्ये स्फोटके लावून घातपात करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण अमेरिका आणि युरोपीय देशांना लागली आहे. हा इशारा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर विचारमंथन सुरू आहे. त्यानुसार विविध खंडांचा प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये लॅपटॉप आणि टॅब्लेटवर पूर्णपणे निर्बंध लादण्यावर विचार सुरू आहे.
 
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे अमेरिकी संरक्षण व गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युरोपीय संघाच्या संरक्षण अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीत युरोपमधून अमेरिका आणि तेथून परत येणाऱ्या उड्डाणांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. दहशतवादी हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी आणखी कडक सुरक्षा व्यवस्था कशी करता येईल, यावर दोन्ही खंडांच्या अधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.
 
अमेरिकेतील एक संरक्षण अधिकारी म्हणाले की, दहशतवाद्यांनी भीती निर्माण करण्यासाठी नवे उपाय योजले आहेत. यात लॅपटॉप, टॅब्लेटसारख्या कंझ्युमर डिव्हाइसचादेखील समावेश आहे. सध्या ७ मुस्लिमबहुल देशांतून अमेरिका-ब्रिटनमध्ये येणाऱ्या विमानांत लॅपटॉप-टॅब्लेट तसेच स्मार्टफोनसारख्या मोठ्या डिव्हाइसवर बंदी आहे.
युरोपीय संघाचे एक अधिकारी म्हणाले, अमेरिकी संरक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती दिली आहे. ही माहिती अद्याप उघड केली जाऊ शकत नसली तरी आमचे लक्ष आयएसच्या हालचालींवर आहे. या संघटनेने अशा प्रकारच्या उपकरणांमध्ये बसवता येण्याजोगा बॉम्ब विकसित केल्याची माहिती मिळाली आहे. युरोपमधील विमानतळांवर या उपकरणांसंबंधीच्या नियमांच्या कक्षा वाढू शकतात. कारण ही विमानतळे वर्दळीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहेत.  
 
{ काही कंपन्यांनी आपल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना लॅपटॉप तसेच टॅब्लेटची तपासणी न करू देण्याची सक्त ताकीद दिलेली असते. कारण यामधून कंपनीची व्यावसायिक संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका असतो.
{ तंत्रज्ञांच्या मते, प्रवासी विमानांमध्ये उड्डाणादरम्यान खूप उपकरणे असल्यास धोका वाढतो. कारण लिथियम-आयन बॅटरी लवकर पेट घेते.
{ सध्या अशा निर्बंधांमुळे अमेरिकेत जाणाऱ्या दिवसभरातील ५० उड्डाणांवर परिणाम होत आहे. हा नियम युरोपपर्यंत लागू झाला तर दररोज ३९० उड्डाणांवर परिणाम होईल. यामुळे दरवर्षी प्रवाशांना ६,८६८ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
{ अशा उपकरणांवर पूर्णपणे निर्बंध लादण्याऐवजी  प्रवाशांकडील उपकरण ऑन करून सुरक्षेच्या दृष्टीने त्याची तपासणी करता येईल.
{ विमानतळावर अधिक प्रशिक्षित श्वानपथकाचा वापर केला पाहिजे.
- जेम्स केंटर
बातम्या आणखी आहेत...