आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपीय युनियनचा गुगलवर 17,400 कोटी दंड, आकडा गुगलच्या वार्षिक कमाईच्या 10 टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- गुगलला चुकीच्या पद्धतीने विक्री सेवेला प्रोत्साहन देण्याचा फटका बसला आहे. युरोपीय युनियनने त्यांची पॅरेंट कंपनी अल्फाबेटवर १७,४०० कोटींचा दंड लावला. हा आकडा गुगलच्या वार्षिक कमाईच्या १०% आहे. गुगलने शॉपिंग सर्व्हिस पहिल्यांदा दिसावी म्हणून सर्च रिझल्टमध्ये तांत्रिक फेरफार केला. यामुळे अन्य कंपन्यांचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर गुगलने ९० दिवसांच्या आत तंत्रज्ञानात बदल केला नाही तर त्यांना आणखी दंड द्यावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. दंड अल्फाबेटच्या प्रतिदिन जागतिक उलाढालीच्या ५ टक्के असेल. साधारण ७ वर्षांच्या चौकशीनंतर ईयूने ही कारवाई केली.

गुगलविरुद्ध अनेक कंपन्यांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्याकडून सर्च रिझल्टमध्ये फेरफार होत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये येल्प, ट्रिप अॅडव्हायझर, फाउंडेम, न्यूज कॉर्प व फेअर सर्च आदींचा समावेश आहे. एखाद्या कंपनीवर एवढा दंड आकारण्याची ईयूतील फसवणूक खटल्यातील ही पहिलीच वेळ आहे. 

युरोपीय संघटनेच्या फसवणूक नियमानुसार गुगलची कृती अवैध आहे. त्यंानी अन्य कंपन्यांना गुणवत्तेच्या आधारे  स्पर्धा व नवोन्मेशाच्या अधिकारापासून वंचित ठेवले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुगलने युरोपच्या ग्राहकांना सेवेतील पसंती उपलब्ध करून दिली नाही.
- मार्गेथ वेस्टेगर, युरोपियन संघटनेच्या कमिशनर
बातम्या आणखी आहेत...