आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Europes First Woman Suicide Bomber Was A Party Animal And No Interest In Religion

युरोपच्‍या पहिल्‍या सुसाइड बॉम्बरला दारूचे व्‍यसन, धर्मात नव्‍हता रस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसना अत बोलाचेन - Divya Marathi
हसना अत बोलाचेन
पॅरिस - गत आठवड्यामध्‍ये पॅरिसवर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य सूत्रधाराला पकडण्‍यासाठी फ्रान्‍स पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. यामध्‍ये या हल्‍ल्‍याच्‍या कटात सहभागी असलेली हसना अत बोलाचेन या तरुणीने आत्‍मघाती बॉम्‍बने स्‍वत:ला उडवून दिले. यात हल्‍ल्‍याचा मास्टर माइंड अब्देलहामिद अबाऔद हासुद्धा ठार झाला. दरम्‍यान, युरोप मधील पहिली सुसाइड बॉम्बर म्‍हणून कुप्रसिद्ध झालेल्‍या हसनाचे काही फोटो समोर आले आहेत. असे सांगितले जाते की, तिला धर्मावर काहीही विश्‍वास नव्‍हता. पार्टी करणे, दारूपिणे यातच तिला अधिक रस होता. मित्रांमध्‍ये ‘काउगर्ल’ या नावाने तिची ओळख होती.
मित्र आणि भावाने हसनाबाबत काय सांगितले ?
> हसना कुठलाच धर्म मानता नव्‍हती.
< ती कुराण वाचत नव्‍हती. मात्र, एका महिन्‍यापूर्वीच तिने बुर्का घालणे सुरू केले होते.
> तिच्‍या भावाने दिलेल्‍या माहितीनुसार, आपल्‍या मस्‍तीत जगणे तिला आवडत असे. ती फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर खूप सक्रिय होती.
< भाई-बहीण या नात्‍याला ती मानत नव्‍हती. भाऊ युसूफसोबत पाच वर्षांपासून तिने अबोला धरला होता.
> तीन आठवड्यापूर्वी तिने आपल्‍या प्रियकरासोबत राहण्‍यासाठी घरही सोडले.
< तिचे कुटुंब वर्ष 1973 मध्‍ये मोरक्को येथून पॅरिसला आले होते.
> तिच्‍या मित्रांनी सांगितले की ती दारू खूप पित होती. मुस्‍लीम धर्माचे काहीही पालन करत नव्‍हती.
> काउबॉय हॅट घालत असल्‍याने तिचे मित्र तिला 'काउगर्ल' म्‍हणत.
< नट्टा-पट्टा करणे तिला आवडत असे.
> तिचे जे फोटोज समोर आले आहेत त्‍यात तिने आपल्‍या हातात दारूची बॉटल पकडलेली आहे.
स्‍वत:ला उडवण्‍यापूर्वी म्‍हटले, “हेल्प मी, हेल्प मी’
प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहिती नुसार, पोलिसांसोबत सुरू असलेल्‍या चमकमीदरम्‍यान ती, ''हेल्प मी, हेल्प मी, मी याची गर्लफ्रेंड नाहीये,'' अशी म्‍हणाली आणि तिने स्‍वत:ला आत्‍मघातकी बॉम्‍बने उडवले
सडकेवर मिळाले हसनाचे डोके
स्‍वत:ला आत्‍मघातकी बॉम्‍बने उडवल्‍यानंतर सुरक्षा संस्‍थांना तिचे डोके आणि पाठीचा कणा रस्‍त्‍यावर मिळाला.
पुढे पाहा हसना आणि तिच्‍या घराचे फोटोज...