आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॅंडसम PM वर फिदा आहेत तरूणी, या कारणांमुळे जगभर प्रसिद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनाडाचे पंतप्रधान जस्तिन तरूणींपासून अबालवृद्धात लोकप्रिय आहेत. - Divya Marathi
कॅनाडाचे पंतप्रधान जस्तिन तरूणींपासून अबालवृद्धात लोकप्रिय आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत भेटीवर येऊ शकतात. नुकतेच कॅनडात नियुक्त केलेले भारतीय राजदूत विकास स्वरूप यांनी ही आशा व्यक्त केली. खरं तर ट्रूडो हे सर्वात हॅंडसम पीएम म्हणून ओळखले जातात. दिलखुलास आणि मनमिळावू ट्रूडो जिथे कुठे जातात तेथे त्यांची मीडियात होते. वडिलांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी आले राजकारणात....
 
- जस्टिनचे पिता पियरे इलिएट ट्रूडो कधी काळी कॅनडाचे पंतप्रधान राहिले आहेत.
- त्यांचे वडिल दोन वेळा सुमारे 15 वर्षे कॅनडाचे पंतप्रधान राहिले.
- मात्र, जस्टिनला राजकारणाचा वारसा मिळाला नाही. यासाठी त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागले. 
- वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि लोकांच्या मनात स्थान मिळवले.
- जस्टिनचे वडिलांचे निधन वर्ष 2000 मध्ये झाले आणि त्यानंतर त्यांनी आठ वर्षानी राजकारणात प्रवेश केला. 
 
या कारणांमुळे आहेत प्रसिद्ध- 
 
- जगभरातील जस्टिन हे एकमेव पीएम आहेत, ज्यांच्याकडे कोणतेही सिक्युरिटीचा ताफा नाही. 
- ते कॅनडात नेहमी रस्त्यावर चालताना किंवा शॉपिंग करताना दिसतात. 
- एवढेच नव्हे तर, ते एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे नेहमी सार्वजनिक बसने प्रवास करतात.
- जर वेळ असेल तर ते कोणत्याही रॅली,  कार्यक्रमात सहभागी होत असतात. 
- जस्टिन गे-लेस्बियनच्या परेड किंवा रॅलीतही जातात.
- याशिवाय आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वामुळेही त्यांना ओळखले जातात.
- मीडियात आजपर्यंत त्यांचा असा एकही फोटो आला नाही ज्यात ते रागात दिसले. 
- जस्टिनला मुलांसमवेत खेळणे आवडते. त्यांचा हा नटखट अंदाज संपूर्ण कॅनडात फेमस आहे. 
 
वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक महिने येत होते शोक संदेश, फोन-
 
- जस्टिनने 2000 मध्ये आपल्या वडिलांच्या निधनाबाबत एक शोक संदेश वाचला होता. 
- तो देशाला इतका पसंत आला होता की, कॅनडा ब्रॉडकॉस्टिंग सर्विसकडे तो संदेश टेलिकॉस्ट करण्यासाठी रोज शेकडो फोन कॉल्स यायचे. 
- मुलांपासून प्रौढ लोकांपर्यंत त्यांचे फॅन्स आहेत. कारण वृद्ध लोकांसोबत त्यांचा व्यवहार पीएमसारखा नव्हे तर घरातील सदस्याप्रमाणे असतो.
- जस्टिनने कॉलेजच्या काळात दोस्त सोफिया ग्रेगरीसबत 2005 मध्ये लग्न केले. आता ते तीन मुलांचे पिता आहेत. 
- देशात होणा-या रॅली असो की आंदोलन ते जर त्यात सहभागी झाले तर मोठंमोठे समस्याही लागलीच सुटतात.
- कारण लोकांना जस्टिन यांच्याबाबत तेवढा विश्वासच वाटतो. त्यांच्याबाबत सांगितले जाते की, जर त्यांना रागाने अपशब्द बोलले तरी ते त्यांना गळाभेट घेतात व शांत करतात. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जस्टिन यांचा अंदाज, ज्यामुळे संपूर्ण कॅनडासह अनेक देशात पसंतीचे नेते आहेत....
बातम्या आणखी आहेत...