आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex defence Contractor Guilty Of Sending US Data To India

संरक्षण साहित्यासंबंधीची माहिती भारतात पाठवल्या प्रकरणी अमेरिकी संरक्षण कंत्राटदार दोषी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - देशाच्या संरक्षण साहित्यासंबंधीची माहिती भारतात पाठवल्याच्या प्रकरणात अमेरिकेत एका कंत्राटदारास दोषी ठरवण्यात आले आहे. हन्ना रॉबर्ट (४९) असे कंत्राटदाराचे नाव आहे. रॉबर्ट यांनी न्यायधीश एन. थॉमसन यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाची परवानगी नसताना रॉबर्ट यांनी लष्करी तंत्रज्ञानाची माहिती भारतातील कंपनीला विक्री केली होती. ही कृती अमेरिकी आर्म्स एक्स्पोर्ट कंट्रोल अॅक्टचे उल्लंघन करणारी आहे. त्यांनी जून २०१० ते डिसेंबर २०१२ पर्यंत भारताला संरक्षणविषयक तंत्रज्ञानाची विक्री केली होती.
पाणबुडीची कार्यप्रणाली कशी असते, याचीही माहिती विकण्यात आली होती. लष्करी हल्ले करणारे हेलिकॉप्टर तसेच एफ-१५ लढाऊ विमानांसंबंधी गुप्त माहिती भारताला पाठवण्यात आली होती. रॉबर्ट यांनी वन सोर्स यूएसए अँड काल्डवॅल कम्पोनंट्स नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून अमेरिकेच्या संरक्षण विभागातील संरक्षण हार्डवेअर आणि सुट्या भागांचा पुरवठा करण्याचे कंत्राट त्यांच्याकडे होते.
खराब सुट्या भागांमुळे ४७ लढाऊ विमाने धूळ खात

कंत्राटदारांकडून अमेरिकेला खराब सुट्या भागांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेची ४७ विमाने धूळ खात पडून राहिली. त्यांच्या दुरुस्तीवर देशाला सुमारे ९३.२२ लाख रुपयांचा भुर्दंडही सोसावा लागला आहे.