आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनिजाद अचानक निवडणूक मैदानात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहराण- इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनिजाद यांनी बुधवारी अचानक अध्यक्षपद निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी त्यांना निवडणुकीपासून दूर राहण्याचा आदेश दिला होता, तो मानण्यास त्यांनी नकार दिला. 

जागतिक शक्तींसोबत अणुकरार करणारे अध्यक्ष हसन रुहानी यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जात होता, पण त्यांनी अजूनपर्यंत अर्ज दाखल केलेला नाही. शनिवार ही अंतिम मुदत आहे.  

रुहानी हे उदारवादी नेते मानले जातात. याउलट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ताठ्यापुढे इराणला एका कठोर राष्ट्राध्यक्षाची गरज आहे, असे बहुतांश इराणी नागरिकांचे मत आहे. अहमदीनेजाद यांच्या अर्जामुळे इराणच्या राजकारणातील फूट पुन्हा एकदा समोर आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...