आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Model File Case Against Businessmen Over Alleged Rape

लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अमेरिकी बिझनेसमनवर 5,370 कोटींचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- स्वीडनच्या एका माजी मॉडेलने वॉल स्ट्रीट फायनान्सरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला असून 850 मिलियन डॉलरचा (5,370 कोटी रुपये) दावा ठोकला आहे. न्युयॉर्क ग्लोबल ग्रुपचे 43 वर्षीय बेंजामिन वे यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. दावा ठोकणाऱ्या मॉडेलचे नाव हॅना बोवेंग (वय 25) असे आहे. बेंजामिन यांनी तिला त्यांच्या कंपनीत मार्केटिंग चिफ म्हणून ठेवले होते. कमी कपडे घालण्यासाठी आणि 2013 मध्ये सेक्स करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप हॅनाने केला आहे.
हॅना बोवेंगचे वकील डेव्हिड रॅटनर यांनी मॅनहटन कोर्टात सांगितले, की वॉल स्ट्रीटवरील एका नामांकीत बिझनेसमनवर 23 वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बेंजामिन यांनी तिला नोकरीवर ठेवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला.
न्युयॉर्क पोस्टच्या एक रिपोर्टनुसार, बेंजामिन यांनी हॅनासाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. येथेच तिचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या फ्लॅटचे भाडे 3,600 डॉलर प्रति महिना (सुमारे सव्वा दो लाख रुपये) होते.
डेव्हिडने सांगितले, की बेंजामिन एका दिवस हॅनाला डिनरवर घेऊन गेला होता. यावेळी त्याने तिला 2,000 डॉलर किमतीची बॅग भेट दिली होती. त्यानंतर त्याने तिच्या ड्रिंकमध्ये काही तरी मिसळले. त्यानंतर तिच्यासोबत सेक्स केला. हे सगळे केवळ दोन मिनिटात त्याने आटोपले. या घटनेनंतर हॅना खूप घाबरली होती. याची तक्रार हॅनाने केली. तेव्हा तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, माजी मॉडेल हॅनाचे मॉडेलिंगचे फोटो.....