आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exercise Equipments In Metro Train In Maxico City

मेक्सिको सिटीच्या मेट्रो रेल्वेमध्येच बसवली वाढता स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायामासाठीची यंत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सिटी- ब्रिटन आणि अमेरिकेसमोरील सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर नागरिकांचा वाढता स्थूलपणा हीच आहे. लहान मुलांचे वाढते वजन हा सर्वात चिंतेचा विषय आहे. या देशांमध्ये दीर्घकाळापासून जागरूकता अभियान आणि आरोग्य कार्यक्रम राबवले जात आहेत. आता तर त्यासाठी आकर्षक ऑफर्सही दिल्या जाऊ लागल्या आहेत.
मेक्सिकोच्या सिटी मेट्रोने अशीच एक भन्नाट ऑफर देऊ केली आहे. मेक्सिकोच्या मेट्रोमध्ये स्थूल लोकांना मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना आधी व्यायाम करावा लागणार आहे आणि तोही स्टेशनवरच! स्थूलपणाची समस्या असलेल्या देशांत मेक्सिको दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील सुमारे ३.७ कोटी लोकांचे वजन वाजवीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच ते स्थूलपणाला बळी पडलेले आहेत. त्यामुळे स्थूलपणा नियंत्रित करण्यासाठी तेथे कठोर उपाय योजण्यात आले आहेत.

दरवर्षी १०० कोटी प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मेक्सिको सिटी मेट्रोने २१ स्टेशन्सवर ३० एक्सरसाइज मॉनिटर बसवले. त्याच्या समोर दहा ऊठबशा काढणाऱ्यांना मेट्रोच्या प्रवासाची तिकिटे फुकट दिली जात आहेत. एखाद्या व्यक्तीला जेथे जायचे आहे, त्याचा तपशील द्यावा लागतो. त्यानंतर रॅम्पवर ऊठबशा काढाव्या लागतात. त्याचे निर्देश ही यंत्रेच देतात. ही यंत्रे ऊठबशांचा हिशेबही ठेवतात. एखाद्या व्यक्तीने दहा ऊठबशा काढल्या की त्यातून तिकीट बाहेर येते. मेट्रोने त्यासाठी ५० हजार तिकिटे आरक्षित केली. ऊठबशा पूर्ण झाल्यावर किती वजन जास्त आहे व ते कसे कमी करायचे याच्या सूचनाही ही यंत्रे देतात. जे कोल कोणत्याही शारीरिक हालचाली न करता तासन‌् तास जागेवरच बसून राहतात त्यांनाही ही यंत्रे सतर्क करतात. या यंत्रांशिवाय १२ मेट्रो स्टेशनवर खास क्लिनिकही उघडण्यात आले आहेत. तेथे स्थूलपणा कमी करण्याचा मोफत सल्ला आणि उपचार मिळतो. अशाच ऊठबशा काढून झालेली प्रवाशी मोनिका वेक्लाव्हेज सांगते की,‘ही खूपच चांगली अॅक्टिव्हिटी आहे. लोकांत जागरूकतेचे चांगले काम केले जात आहे,’ असे मला वाटते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्यायाम करताना प्रवासी