आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामने लठ्ठपणा कमी होत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढत नाही. मुळात साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्याने लठ्ठपणा वाढण्‍यामागील खरे कारण आहे. व्यायामाच्या माध्‍यमातून यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही. ब्रिटनचे संशोधक डॉ असीम मल्होत्राने आपल्या नव्या शोधत संबंधित दावा केला आहे. ब्रिटनमधील मेडिकल जर्नलमध्‍ये प्रकाशित झालेल्या लेखात मल्होत्रा म्हणतात,की व्यायामाच्याबाबत अनेक मिथके आहेत. लठ्ठपणा कमी करण्‍यासाठी व्यायाम परिणामकारक ठरत नाही. मात्र त्याने मधूमेह, हृदयाशी संबंधित आजारावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. लठ्ठपणा कमी करायचे असेल, तर आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे.