आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लासगो येथे वर्तमानपत्राचा व्यवसाय उलगडून दाखवणारे प्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूकेची राजधानी ग्लासगो येथील लाइट हाऊस ‘ग्लासगो हेरॉल्ड’वर्तमानपत्राच्या इमारतीमुळेही प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दैनिकाचे जगातील पहिले प्रदर्शन सुरू आहे. येथे सर्वोत्कृष्ट वर्तमानपत्रांचे मुखपृष्ठ, त्यातील विशेष मजकूर आणि त्या वर्तमानपत्रांचे ऐतिहासिक अंक प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या स्ट्रीट व्हेंडर्सच्या कामाविषयीदेखील सांगितले आहे.  

या प्रदर्शनात वर्तमानपत्रातील उच्च प्रतीचे डिझाइन वर्क आणि उत्पादनातील बारकाव्यांविषयी माहिती देण्यात आली आहे.  

हे प्रदर्शन इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ स्ट्रीट पेपर्स (आयएनएसपी) समूहाकडून भरवण्यात आले आहे. यात १० हजार सदस्यांचा सहभाग आहे. घरांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचण्याच्या साखळीत ते कुठे ना कुठेे सहभागी आहेत.  आयएनएसपीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी मेरी अॅडम यांच्या मते, जगभरात तीन लाखांहून अधिक व्हेंडर्स असे आहेत, ज्यांचे आयुष्य या कामामुळे पार बदलून गेले आहे. तसेच समाजात विविध विषयांवर जागृती करण्याचे कामही ते करत आहेत.  
}positivelyscottish.scot
बातम्या आणखी आहेत...