आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Experiences Of Indians Who Experienced Mecca Stampede

मक्का दुर्घटना : काळा रस्ता मृतदेहांमुळे बनला पांढरा, भारतीयांनी सांगितली आपबिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबच्या पवित्र मक्का शहरात्या मीनामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 717 वर गेला आहे. एका टिव्ही चॅनलने दिलेल्या माहितीनुसार ब्रिजवर लाखो लोक दगड मारण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरूनही काही लोक आहे. त्यामुळे अचानक गोंधळ उडाला. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी लोक एकमेकावर चढू लागले. काह पुलांच्या खाली देखिल पडत होते. मृतांमध्ये बहुतांश नायजेरिया, नायजर, चाड आणि सेनेगलचे होते. त्यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. लोक अल्लाहचे नाव घेऊन मदत मागत होते, पण त्यांचे ऐकणारे कोणीही नव्हत. अनेक ट्रक आणि कंटेनरमध्ये मृतदेहांचे खच होते. काळा रस्ता मृतदेहामुळे पांढरा बनला होता.

'पंधरा मिनिटांपूर्वीच निघालो'
भोपाळच्या काझी सय्यद मुश्ताक अली नदवी यांनी सांगितले की, सकाळचे दहा वाजले होते. नातेवाईक आणि भोपाळच्या इतर हाजींबरोबर आण्गी हरम शरीफजवळ शैतानाला दगड मारण्याची परंपरा पूर्ण करून आम्ही निघालो होतो. जवळपास दीड किलोमीटर दूरपर्यंत आलो तेव्हा मीनामध्ये चंगराचेंगरी झाल्याचे समजले. आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा समजले की हरम शरीफ जवळ ही दुर्घटना घडली आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. स्वतःसह नातेवाईकांना सावरले आणि आम्ही पुन्हा मीना येथे पोहोचलो. सर्वांना कॅम्पमध्ये बसवून त्याठिकाणाहूनच सौदी अरबच्या अधिका-यांशी संपर्क केला. सुदैवाने पंधरा मिनिटांपूर्वीच आम्ही त्याठिकाणाहून निघालो होतो.

' देवाचे आभार मानले'
नॅशनल हॉकी प्लेयर सय्यद इम्रान अली यांनी सांगितले की, हरम शरीफमघध्ये शैतानाला दगड मारण्यादरम्यान ग्राऊंड फ्लोअरवर दुर्घटना घडली. त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनंतर पाचव्या मजल्यावर दगड मारण्यासाठी मी इतर सहकाऱ्यांबरोबर पोहोचलो. त्याठिकाणी हा विधी शांततेत सुरू होता. बाहेर येऊन मी जेव्हा कॅम्पकडे परतलो तेव्हा रस्त्यात याबद्दल माहिती मिळाली. सोबत मोबाइल फोन नेलेला नव्हता. त्यामुळे सहकाऱ्यांसोबत अत्यंत वेगात परतलो. मोबाइल सुरू करताच सर्वांचे फोन यायला सुरुवात झाली होती. सर्वांना सुरक्षित असल्याचे कळवले आणि देवाचे आभार मानले.
14 भारतीय ठार, परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा...
परराष्ट्र मंत्रालयाने 14 भारतीयांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या 13 भारतीयांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. सौदीच्या सिव्हील डिफेन्स डायरेक्टोरेटने सांगितले की, सुमारे 863 लोक जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांमध्ये हज यात्रेदरम्यान घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे.
जखमींची नावे
नावकव्हर नं./पासपोर्ट नं.राज्यहज कमेटी ऑफ इंडिया/प्रायव्हेट टूर ऑपरेटर्सहॉस्पिटल
1.रलियाथ पक्कियोदाLDF-164-3-0लक्षद्वीपहज कमेटी ऑफ इंडियाअल जसर
2.अब्दुल कय्यूमWBF-2930-5-0पश्चिम बंगालहज कमेटी ऑफ इंडियाअल जदीद
3.जहानूर बेगमASF-271-5-0असमहज कमेटी ऑफ इंडियाअल जदीद
4.शेख शाहिदा बेगम महमूदMA4519109महाराष्ट्रप्राइवेट टूर ऑपरेटर्सशेशा मक्का
5.सारा बेगमJKR-2585-2-0जम्मू-कश्मीरहज कमेटी ऑफ इंडियाशेशा मक्का
6.गुलाम अहमद शेरगुजरीJKR-2532-2-0जम्मू-कश्मीरहज कमेटी ऑफ इंडियाशेशा मक्का
7.राएछा बेगमWBF-3055-5-0पश्चिम बंगालहज कमेटी ऑफ इंडियाशेशा मक्का
8.अट्टारी हतीमL7628897राजस्थानप्राइवेट टूर ऑपरेटर्समीना डिस्पेंसरी
9.मंजूरहुसैन हबीबुल्लाह शेखGJR-1011-2-0गुजरातहज कमेटी ऑफ इंडियामीना आर्म्ड फोर्स
10.महम्मद फजेजुलBRF-1963-5-0बिहारहज कमेटी ऑफ इंडियामीना आर्म्ड फोर्स
11.महम्मद अब्दुल हामीदORR-67-2-0उड़ीसाहज कमेटी ऑफ इंडियामीना आर्म्ड फोर्स
12.अयीसोमा मरियादनKLR-9384-2-0केरलहज कमेटी ऑफ इंडियाहेरा हॉस्पिटल, मक्का
13.हैदर अलीUPF-23632-2-0उत्तर प्रदेशहज कमेटी ऑफ इंडियाकिंग अब्दुल्ला हॉस्पिटल, मक्का
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS