आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जकार्तामध्ये UN ऑफिसजवळ स्फोट, दहशतवादी हल्ल्यात सात ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्तावर इस्लामिक स्टेटकडून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी राजधानी जकार्ता साखळी स्फोटांनी हादरले. जकार्तामधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑफिसला लक्ष्य करण्यात आले होते. एका पाठोपाठ एक सहा स्फोट झाले. सातवा स्फोट 11.45 दरम्यान झाल्याची माहिती आहे. यात सात जण मारले गेले असून अनेक जखमी आहेत. अजूनही काही ठिकाणी फायरिंग सुरु आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाले त्या भागात संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय, मॉल, स्टारबक्स कॉफी शॉप आणि फ्रान्स दुतावास आहे.
जाणून महत्त्वाचे UPDATES
1: 50 PM : थिएटरला सुरक्षा रक्षकांनी बाहेरून वेढा टाकला आहे.
12:40 PM : मॉलच्या थिएटरमध्ये घुसून दहशतवादी करत आहेत फायरिंग.
12:10 PM : इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो म्हमाले, 'परिस्थिती आता नियंत्रणात आहे, लोकांनी संयम बाळगावा.'
12:01 PM : मॉलजवळ चौथा दहशतवादी मारला गेला.
11.52 AM: हल्ल्यात सातजण मारले गेले.
11.30 AM : जकार्तामध्ये सातवा स्फोट झाल्याचे वृत्त.
10:58 AM : पोलिसांचा दावा आयएसने केला हल्ला.
10:54 AM : पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील काही ठिकाणी दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे घातक शस्त्र आहेत.
10:48 AM : प्रवक्त्याचे म्हणणे आहे, की आयएसने डिसेंबरमध्ये धमकी दिली होती की आम्ही लवकरच इंडोनेशियात 'लाइव्ह कॉन्सर्ट' करणार आहोत.
10:48 AM : जकार्ता पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले की सहा जण मारले गेले आहेत. त्यातील 3 पोलिस आणि 3 सामान्य नागरिक आहेत.
10:41 AM : पोलिसांचे म्हणणे आहे, की हल्लेखोर बाइकवर आले होते. त्यांनी दुतावासाजवळ ग्रेनेड फेकले.
10:32 AM : घटनास्थळी उपस्थित असलेल्या 'रॉयटर्स'च्या फोटोग्राफरने सांगितले, स्टारबक्स कॅफेच्या छतावर एक हल्लेखोर आहे. तो वरुन फायरिंग करत आहे. कॅफेच्या सर्व खिडक्या फुटल्या आहेत. कॅफेमध्ये ब्रेकफास्टसाठी आलेले काही लोक अडकले आहेत. पोलिस त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे.
10:30 AM : सूत्रांचे म्हणणे आहे, की विदेशी टुरिस्टला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. ज्या भागात हल्ला झाला तिथे लक्झरी हॉटेल्स, मल्टीनॅशन कंपन्या आणि ऑफिस आहे.
10:25 AM : दहशतवादी हल्ल्यात चौथा व्यक्ती मारला गेल्याचे वृत्त आहे. फ्रान्स दुतावास येथून अवघ्या 300 मीटरवर आहे.
10:15 AM :पोलिसांचे म्हणणे आहे, की 14 हल्लेखोर आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहे.
10:10 AM : 1962 मध्ये तयार झालेल्या सेरेना मॉलाजवळ बॉम्बस्फोट झाले.
09.48 AM : जकार्तामधील दहशतवादी हल्ल्यात तीन जण मारल्याचे वृत्त.
09.40 AM : जिथे हल्ला झाला तेथून जवळच राष्ट्रपती निवासस्थान, यूएन ऑफिस, फ्रान्स दुतावास आणि स्टारबक्स कॅफे आहे.

09.30 AM : जकार्तामध्ये 6 शक्तीशाली स्फोट. यूएन ऑफिसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न.

विदेशी नागरिक लक्ष्य
सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. या परिसरात अनेक लक्झरी हॉटेल्स आणि मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यासोबतच अनेक देशांचे दुतावासही याच परिसरात आहे. नुकताच दहशतवादी हल्ला झालेल्या फ्रान्सची अॅम्बसी स्फोट झाला त्या ठिकाणापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे.

इंडोनेशियात आधी झालेले स्फोट
- बालीमध्ये 2002 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा 202 लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यात सर्वाधिक विदेशी नागरिक होते
- 2003 मध्ये जकार्ताच्या मॅरिएट हॉटेलजवळ स्फोट झाला होता, त्यात 12 लोक मारले गेले होते.
- 21 डिसेंबर 2015 रोजी इंडोनेशियाच्या विविध शहरातून 9 संशयितांना पकडले होते.
- आस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून इनपूट मिळाले होते, की आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी जावा आणि सुमात्रामध्ये हल्ल्याचा कट रचत आहे.
हाय अलर्टनंतर हल्ला
- पॅरिस हल्ल्यानंतर इंडोनेशियात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
- नव्या वर्षाच्या सुरुवातीला एकट्या जकार्तामध्ये 15 हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. बालीमध्ये 9 हजार पोलिस तैनात होते.
दोन घटनांशी जोडला जातो संबंध
- बुधवारी अबु बकर बशीर नावाच्या दहशतवाद्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचा जोरदार विरोध झाला होता.
- इमाम समुद्रा नावाच्या दहशतवाद्यानेही दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती.
पुढील स्लाईडवर पाहा, व्हिडिओ तसेच या घटनेनंतरचे फोटोज...