आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुवेत, ट्यूनीशिया आणि फ्रान्समध्ये ISIS चे हल्ले, 53 जणांचा मृत्यु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेत सिटी/पॅरीस/ सूजे- फ्रान्स, कुवेत आणि ट्यूनीशिया या तीन देशात काही तासांच्या अंतराने झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये एका गॅस फॅक्टरीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला: एकाचे शीर कापले
दक्षिण-पूर्व फ्रान्सच्या सेंट क्वेंटिन फॅलेव्हर येथील एका गॅस फॅक्टरीमध्ये आज (शुक्रवार) दहशतवादी हल्ला झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोराने एका व्यक्तीचे शीर कापले. तसेच अनेक लोक जखमी झाल्याची माहितीही मिळाली आहे. प्राथमिक वृत्तानुसार हल्लेखोरांच्या हातामध्ये ISIS (इस्लामिक स्टेट्स) चा झेंडा होता.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास हा हल्ला झाला. बीबीसीच्या माहितीनुसार सेंट क्वेंटिन फॅलेव्हरमध्ये एअर प्रॉडक्ट्स फॅक्टरीमध्ये अनेक कमी तीव्रतेचे स्फोट झाले. फॅक्टरीमध्ये एका गाडीवर स्वार होऊन काही जणांनी प्रवेश केला. त्यानंतर एक स्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. फॅक्टरीजवळ एक शीर नसलेला मृतदेह आढळला आहे. गृहमंत्री बर्नाड कॅजेन्यूव्ह त्वरित घटनास्थळी रवाना झाले आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वेल्स यांनी शहराच्या आसपास संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. फ्रान्सच्या सरकारने या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

ट्युनिशियात दोन हॉटेल्समध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार, 19 ठार
ट्युनिशियात दोन हॉटेल्सवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारा 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

कुवेतमध्ये 'जुम्मे की नमाज'वेळी मशिदीत शक्तिशाली स्फोट...
कुवेतच्या राजधानीमधील एका मशिदीत झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक चिमुरड्यांचा समावेश आहे. फ्रान्स आणि कुवेतमधील हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'ने स्विकारली आहे.

कुवेत सिटी- कुवेतची राजधानी कुवेत सिटी आज (शुक्रवार) शक्तिशाली स्फोटाने हादरले. कुवेतमधील सगळ्यात मोठी अल सादिक शिया मशिदीत हा स्फोट झाला. यात 11 जण ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चिमुरड्यांचा समावेश आहे.

कुवैत सिटीच्या पूर्वेला असलेल्या अल इमाम अल सादिक शिया मशिदीत जुम्मे का नमाज अदा केला जात असतानाच अचानक शक्तिशाली स्फोट झाला. यावेळी मुस्लिम लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहशतवादी संघटना आयएसआयएसने या स्फोटाची जबाबदारी स्विकारली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, कुवेतमधील मशिदीती स्फोटाची भीषणता...
बातम्या आणखी आहेत...