आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत गुरुद्वारात स्फोट, ग्रंथीसह ३ जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - जर्मनीच्या पश्चिम भागातील एस्सेन या शहरात एका गुरुद्वारात भीषण स्फोट झाला. त्यात एका ग्रंथीसह तीन जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता हा स्फोट झाला. तिथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला होता.

विवाह सोहळा उधळून लावण्याच्या उद्देशानेच हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका एसयूव्हीतून पळून जात असलेल्या तीन जणांना संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितले की, या प्रकरणी भारतीय दूतावास जर्मनीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. स्फोटात एक ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोन जखमींचे वय अनुक्रमे ४७ आणि ५६ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये गुरुद्वाराच्या ग्रंथीचाही समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...