आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosion Near Indian Consulate In Afghanistans Jalalabad

अफगाणिस्तानातील पाक दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, 4 पोलिसांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये पाकिस्तानच्या वा‍णिज्य दूतावास परिसर आत्मघातकी हल्ल्याने हादरला. घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर भारत व इराणचा दूतावास आहे. स्फोटात चार पोलिस कर्मचार्‍यांना मृत्यू झाला आहे.

'टोलो न्यूज'नुसार, स्फोटानंतर परिसरात गोळीबार सुरु झाला आहे. याआधी चार जानेवारीला मजार-ए-शरीफमध्ये भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे अफगाणच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने म्हटले होते.


दहशतवादयांनी या कारणामुळे केला हल्ला...
- भारतीय दूतावासावर 4 जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. अफजल गुरूला झालेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.
- चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर दूतावासाच्या भिंतीवर रक्ताने घोषणा लिहिल्या होत्या.
- एक मेसेज म्‍हणजे लिहिले होते- 'अफजल गुरु का इंतकाम'
- दुसर्‍या एका मेसेजमध्ये - 'एक शहीद और हजार फिदायीन'
- 25 तास चाललेल्या एन्काउंटरनंतर चारही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.
- हल्ल्यानंतर सुरु केलेल्या सर्च मोहिमेत बिल्डिंगच्या भिंतींवर उर्दूमध्ये घोषणा लिहिण्यात आल्या होते.
आधी केव्हा झाला होता हल्ला?
- हेरातमध्ये मे 2014 मध्ये दहशतवाद्यांनी भारतीय दूतावासाला टार्गेट केले होते.
- यापूर्वी जलालाबादमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यात 9 जनांचा मृत्यू झाला आहे.