आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनेडी स्पेस सेंटर शक्तिशाली स्फोटाने हादरले, Facebook चे सॅटेलाईट जळून खाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केप कॅनव्हेरल- अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटर गुरुवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. स्पेस एक्स कंपनी रॉकेटचे लॉन्चिंग करतानाा लॉन्च पॅडवर हा स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. फेसबुकचे एक कम्युनिकेशन सॅटेलाईट जळूून खाक झाले आहे. 'एमॉस-6 उपग्रहा'ची किंमत जवळपास 20 कोटी डॉलर एवढी होती.
रॉकेेटमध्ये इंंधन भरताना झाला स्फोट...
- 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेेनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजता हा स्फोट झााला.
- एक अनमॅन्ड रॉकेट टेस्टिंंगसाठी स्पेस एक्स फॉल्कन-9 च्या लॉन्चिंग साइटवर आणले जात होते. स्पेस एक्स हे नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरच्या जवळच आहे.
- रॉकेटमध्ये इंधन भरताना भीषण स्फोट झाला.
- स्फोट इतका भीषण होता की, त्याचा दूरवर परिणाम जाणवला. अनेक इमारतींना जबर हादरा बसला.
- सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- टेस्टिंंगसाठी आणलेले रॉकेट शनिवारी लॉन्च केले जाणार होते.

'फेेसबुक'चे म्युनिकेशन सॅटेलाईट जळूून खाक...
- फेसबुकचे एक कम्युनिकेशन सॅटेलाईट या स्फोटात जळूून खाक झाले आहे. 'एमॉस-6 उपग्रहा'ची किंमत जवळपास 20 कोटी डॉलर एवढी होती.
- 'एमॉस-6'च्या मदतीने सर्व आफ्रिकन देशांमधील नागरिकांना 'फेसबुक'च्या इंटरनेट डॉट ओआरजीच्या माध्यमातून ब्रॉडब्रँड इंटरनेट देण्याची योजना होती.
- यूटेलसॅट कम्युनिकेशन्ससोबतच्या भागिदारीमध्ये फेसबुकने इस्राइलमध्ये बनवलेल्या ‘एमॉस-6’ उपग्रहाचा वापर करण्यात आला होता.

पुुढील स्लाइडवर पाहा, कॅनेडी स्पेस सेंटरमध्येे झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...