आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Explosive Laden Vehicle Caught Outside Afghanistan Indian Consulate

अफगानिस्तान: भारतीय दूतावासावर हल्‍ल्‍याचा पुन्‍हा प्रयत्‍न, स्‍फोटके जप्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी जप्‍त केलेली कार. - Divya Marathi
पोलिसांनी जप्‍त केलेली कार.
काबूल - भारतीय दूतावासावर शुक्रवारी दुपारी पुन्‍हा हल्‍ला करण्‍याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या परिसरात पोलिसांनी स्‍फोटके असलेल्‍या कारसोबत एका संयशितास ताब्‍यात घेतले. ही घटना अफगानिस्‍तानातील हेरात शहरात घडली. सहा दिवसांपूर्वी मजार-ए- शरीफ शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते.
राज्‍यपालांनी उचचली होती बंदूक
- भारतीय दूतावासाच्या बचावासाठी सहा दिवसांपूर्वी बल्ख प्रांताचे गव्हर्नर अता मोहंमद नूर यांनी स्वत: बंदूक हाती घेतली होती.
- त्या ठिकाणी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या (भारत-तिबेट सीमा पोलिस) 48 कमांडोजनी अतिरेक्यांना आत घुसू दिले नाही.
सुरक्षा वाढवली
अफगाणिस्तानमध्ये भारताची महत्त्वाची पाच कार्यालये आहेत. त्यापैकी काबूलमध्ये मुख्य दूतावास आणि जलालाबाद, हेरात, कंदहार तसेच मजार-ए-शरीफमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. सर्व कार्यालयांची सुरक्षा 2008 पासून वाढली आहे.
यापूर्वीही झाला होता हल्‍ला
- यापूर्वी काबुलमधील मुख्‍य भारतीय दुतावासावर 2008 आणि 2009 मध्‍ये हल्‍ला झाला होता.
- मे 2014 मध्‍ये हेरातमध्‍ये दहशतवाद्यांनी भारतीय दुतावासावर हल्‍ला केला होता.
- यापूर्वी जलालाबादमध्‍ये भारतीय दुतावासा झालेल्‍या हल्‍ल्‍यात नऊ जणांचा मृत्‍यू झाला होता.
पुढील स्लाइडवर, पाहा संबंधित फोटो...