आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड दौऱ्यात प्रत्यार्पणासह, आर्थिक, करविषयक करारावर स्वाक्षरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - भारत-थायलंडमध्ये सोमवारी अनेक महत्त्वाच्या करारांवर सहमती झाली. कर, आरोपी प्रत्यार्पणासह द्विपक्षीय आर्थिक सहकार्य करार करण्यास दोन्ही राष्ट्रांनी तयारी दर्शवली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या थायलंड दौऱ्याच्या अंतिम व तिसऱ्या दिवशी उभय देशांत झालेल्या बैठकीत हे निर्णय झाले.

करारानुसार दहशतवादाच्या आरोपीला परस्परांच्या हवाली करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्याची तयारी दर्शवणाऱ्या करारावर दोन्ही देशांकडून स्वाक्षरी करण्यात आली. दहशतवाद, गुन्हेगारी, आर्थिक गुन्हेगारी इत्यादी क्षेत्रातील आरोपींच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया यापुढे अधिक सोपी होणार आहे. गुन्हेगारी क्षेत्रच नव्हे तर कोणत्याही प्रकरणात प्रत्यार्पण करणे दोन्ही देशांसाठी यापुढे अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान, अॅक्ट ईस्ट धोरणानुसार थायलंड हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देश द्विपक्षीय पातळीवरील सहकार्य वाढवण्यावर भर देणार आहेत. ही भागीदारी धर्म-संस्कृतीवर आधारित असून ती बळकट आहे, असे स्वराज यांनी रविवारीच स्पष्ट केले होते.
नालंदाच्या उभारणीस सहकार्य
बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याची तयारी थायलंडने दर्शवली आहे. त्यासंबंधी दोन्ही देशांत सहकार्य करार झाला आहे. एवढेच नव्हे तर थायलंडने पूर्व आशियातील इतर देशांच्या मदतीने हा करार केला आहे. परराष्ट्रमंत्री स्वराज आणि त्यांचे समकक्ष टानासक पाटीमाप्रागॉर्न यांनी करारावर स्वाक्षरी केली. प्राचीन विद्यापीठाचा विकास होणार आहे.
आयुर्वेद अध्यासन
सुषमा स्वराज यांच्या थायलंड दौऱ्यात आणखी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यावर उभय देशांनी सहमती दाखवली आहे. थाई विद्यापीठात आयुर्वेद अध्यासनाची स्थापना करण्यात येणार आहे. आयुष आणि रांगसिट युनिव्हर्सिटी ऑफ थायलंड यांच्यात हा सहमती करार झाला. आयुर्वेदाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधनाचे कार्य त्याद्वारे केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...