आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल, कॉम्प्युटरनंतर टीव्हीसाठी फेसबुक अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - फेसबुक लवकरच टीव्ही स्क्रीनवर येत आहे. कंपनी सेट टॉप बॉक्ससाठी अॅप तयार करत असून ते व्हिडिओ अॅप असेल. या माध्यमातून युजर्स आपल्या फोन व कॉम्प्युटरमधील व्हिडिओ टीव्हीवर पाहू शकतील. सध्या हे अॅप अॅपल टीव्ही, अॅमेझॉन फायर टीव्हीसह मोजक्या टीव्हीवरच वापरता येणार आहे. 

फेसबुकचे उपाध्यक्ष डॅन रोज म्हणाले, ‘या सोशल साइटवर रोज लाखो व्हिडिओ पोस्ट होतात. लोकांना ते पाहायचे असतात. मात्र, इतका वेळ त्यांच्याकडे नसतो. येणारे नवे अॅप यात मदत करेल. युजर्स फोन किंवा कॉम्प्युटरवर आपले फेसबुक अकाऊंट पाहत असताना व्हिडिओ सेव्ह करू शकतील. नंतर मोकळा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीमध्ये इन्स्टॉल केलेल्या अॅपच्या माध्यमातून टीव्हीवर ते पाहू शकतील. यासाठी युजरकडे फेसबुक अकाउंट असणे मात्र गरजेचे आहे. 
 
नव्या अॅपवर फेसबुक पण व्हिडिओ फीड‌्स देईल. यासाठी व्हिडिओ तयार करणाऱ्या लोकांशी आमची बोलणी सुरू आहे. यामुळे अधिकृत व्हिडिओ आम्हाला मिळू शकतील. टीव्हीच्या स्टाइलचा कंटेंट मिळावा म्हणून कंपनीने आपल्या पब्लिशिंग सहकारी कंपन्यांना अधिक वेळ पाहता येतील असे व्हिडिओ तयार करण्यास सांगणार आहे. आमचे नवे अॅप काही आठवड्यांत लाँच होईल. तूर्त यात जाहिराती नसतील.’ काही दिवसांपूर्वी फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, सोशल नेटवर्किंग साइटच्या युजर्सना व्हिडिओ पाहता यावेत म्हणून वेगळा पर्याय मी देऊ इच्छितो.
 
बातम्या आणखी आहेत...