आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक जास्त हायटेक करण्याचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्ट वर्थ (अमेरिका) - फेसबुकला अधिक तंत्रसक्षम करण्यासाठी टेक्सास येथे डेटा सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साइटची संगणकीय क्षमता वाढवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १.४ अब्ज वापरकर्त्यांना मित्र, कुटुंबीयांशी अधिकाधिक संवादी करण्यासाठी काही बदल केले जातील.
टेक्सास येथील फोर्ट वर्थ प्रकल्पासाठी फेसबुकने ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ५ लाख चौरस फुटांच्या जागेत या डेटा सेंटरची उभारणी होत आहे. फेसबुक इंक प्रकल्पासाठी नवीन तंत्रज्ञांची भरती केली जाईल. डेटा सेंटर्समध्ये वाढ करण्याचे फेसबुकचे लक्ष्य आहे.