आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर दिसणार झाकोळलेले चेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - फेसबुकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेने आता नवे तंत्र विकसित केले आहे. याचे प्रात्यक्षिक लवकरच फेसबुकवर पाहण्यास मिळू शकते. या नव्या तंत्रज्ञानामुळे फेसबुकवर अपलोड केलेले झाकोळलेले चेहरेही आता उजागर होतील. या फेसबुक टूलच्या आधारे व्यक्तीची शरीरयष्टी, पेहराव आणि केशरचना यांच्या आधारे तिची आेळख पटू शकेल.

फेसबुकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचे प्रमुख यान लेकून अल्गोरिदमवर संशोधन करत आहेत. अंधुक चेहरे आेळखण्याची क्षमता मानवी मेंदूत असते. त्याच धर्तीवर हे तंत्र विकसित करण्यात येत आहे.

ही आहे उणीव
स्वत:चे छायाचित्र दिसू नये यासाठी प्रयत्न करणार्‍या वापरकर्त्यांची मात्र यामुळे गैरसोय होऊ शकते. यातील उणिवेविषयी शोधकर्त्यांनी काहीच वक्तव्य केलेले नाही. एखाद्या फोटोत तुम्ही मुद्दाम आपला चेहरा झाकला असेल तरीही तुमच्या आयडीला तो लिंक होईल. यावर आक्षेप येऊ शकतात, अशी शक्यता पेनिसिल्व्हानिया विद्यापीठाचे राल्फ ग्रोस यांनी व्यक्ती केली.

तंत्र विकसनाची पद्धती
फ्लिकरवरून संशोधकांनी ४० हजार छायाचित्रे प्रयोगासाठी घेतली आहेत. पैकी काही छायाचित्रांत स्पष्ट चेहरे दिसतात. काही छायाचित्रे विविध कोनांतून घेतल्याने चेहरा स्पष्ट दिसत नाही. या दोन्ही प्रकारच्या छायाचित्रांची आधुनिक न्यूरल नेटवर्कच्या साहाय्याने छाननी सुरू आहे. या नेटवर्कने ८३ % अचूकतेने चेहरे आेळखले.

सुरक्षा व खासगीपणा जपण्यास उपयुक्त
या फेसबुक टूलमुळे सुरक्षा व खासगीपणा जपणार्‍या वापरकर्त्यांना मदत होईल, असा दावा लेकून यांनी केला. इंटरनेटवर स्वत:चा फोटो इतर कोणी शेअर केल्यास वापरकर्त्याला त्याविषयी नोटिफिकेशन मिळेल.
बातम्या आणखी आहेत...