आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: आकाशातून एक्विला देणार १० पट वेगवान इंटरनेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालो ऑल्टो (कॅलिफोर्निया)- आकाशात तरंगणाऱ्या ड्रोनच्या साह्याने लोकांपर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याची पहिली शिडी तयार झाली आहे. त्याचे नाव आहे एक्विला. हे फेसबुकचे सोलर ड्रोन आहे. त्याच्या माध्यमातून जगभरात कानाकोपऱ्यात किंवा दुर्गम भागात सध्याच्या इंटरनेटच्या वेगापेक्षा १० पट वेगाने इंटरनेट पोहोचवले जाणार आहे. मार्क झुकेरबर्ग यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या एक्विलाची घोषणा कंपनीतर्फे नुकतीच करण्यात आली असून डिसेंबरअखेरपर्यंत त्याची चाचणी सुरू होणे अपेक्षित आहे.

फेसबुकचे उपाध्यक्ष जय पारीख यांच्या माहितीनुसार एक्विलाची निर्मिती ब्रिटनमध्ये फेसबुकच्या ऐरोस्पेस टीमने केली आहे. ते तयार करण्यासाठी १४ मिने लागले. एक्विला डॅन बोइंग-७३७ विमानाइतके मोठे आहे. हे सर्वात मोठे पॅसेंजर जेट एअरबस ए-३८० पेक्षा दुप्पट उंचीवर उडू शकते. तसेच तीन महिने न थांबता आकाशात राहू शकते. सॅटेलाइटच्या माध्यमातून जमिनीवर इंटरनेट पाेहोचविण्यासाठी लेजरची मदत घेतली जाणार आहे. हे तंत्रज्ञाना आताच्या उपलब्ध तंत्रज्ञानापेक्षा १० पट जास्त वेगवान आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेत याची चाचणी सुरू होणार आहे. ड्रोनच्या मदतीने इंटरनेट पोहोचविण्याच्या फेसबुकच्या योजनेत
भारताचाही समावेश आहे.
लांबी- १४० फूट, बोइंग ७३७ च्या बरोबर
वजन- ४५० किलो संपूर्ण ड्रोन कार्बन फायबरने बनले आहे
सर्व्हिस सीलिंग- ६०-९० हजार फुटांपर्यंत जाऊ शकते. ए -३८० विमान ४३ हजार फुटांपर्यंत जाते
सेवा क्षेत्र- ५ ० हजार फूट परिघात एक ड्रोन इंटरनेट देऊ शकते
विस्तार - ३ किलोमीटर अंतर असेल दोन ड्रोन दरम्यान
नेटचा वेग- १० जीबी प्रतिसेकंद वेगाने इंटरनेट स्पीड मिळेल
उड्डाण- ९० दिवसांपर्यंत आकाशात तरंगत राहू शकते. सौरऊर्जेवर चालणार
लेझर- ४-५ लेझर गन आहेत. ज्या जमिनीवर इंटरनेट पोहोचवू शकतील.
बातम्या आणखी आहेत...