आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook चे मार्क झुकरबर्ग यांनी दिली Good News, दुसर्‍यांदा हलणार पाळणा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- 'फेसबुक'चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे दुसर्‍यांदा गुड न्यूज आहे. त्यांच्या घरी दुसर्‍यांदा पाळणा हलणार आहे. झुकरबर्ग आणि पत्नी प्रिसिला हे दाम्पत्य पुन्हा आई-बाबा होणार आहे. स्वत: झुकरबर्ग यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर ही गोड बातमी जाहीर केली आहे.

याबाबत झुकरबर्ग म्हणाले ‘मी आणि प्रिसिला फार खुश आहोत, आम्हाला आणखी एका मुलगी व्हावी अशी आमची इच्छा आहे. पहिली मुलगी ‘मॅक्स’च्या जन्मानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या बाळाचा विचार करु असे वाटले नव्हते. पण, मला प्रिसिला पुन्हा गरोदर असल्याचे समजले तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला की, बाळ तंदुरुस्त असावे. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की, आम्हाला दुसरीही मुलगीच व्हावी.’
बातम्या आणखी आहेत...