आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्क झुकरबर्गच्या बहिणीशी विमानात अश्लील वर्तन, शिवीगाळ; 'तो स्वतःला टच करत होता'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फेसबूक संस्थापक मार्क झुकरबर्गची बहिण रॅन्डी झुकरबर्ग हिच्यासोबत विमानात एका व्यक्तीने अश्लील वर्तन केले आहे. तिच्या बाजूला बसलेला आरोपी सतत शिवीगाळ आणि फिगरबद्दल कॉमेंट करून स्वतःला टच करत होता. एयरलाइन्स स्टाफला याबद्दल तक्रार केली असता त्यांनी तिलाच उठून दुसरीकडे बसण्याचा सल्ला दिला. तिने हा सगळा प्रकार फेसबूकवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. 

 

> रॅन्डी झुकरबर्ग गुरुवारी लॉस एंजेलिसहून मेक्सिकोच्या एका शहराकडे जात असताना तिच्या बाजूला एक असभ्य माणूस बसला होता. त्यानेच कशा प्रकारे फ्लाइटमध्ये आपली छेड काढली आण अश्लील वर्तन केले याचा तपशील रॅन्डीने फेसबूकवर मांडला आहे. 
> सुरुवातीला असभ्य भाषा वापरणाऱ्या त्या व्यक्तीला रॅन्डीने शांत राहण्यास सांगताच त्याने शिवीगाळ सुरू केली. यानंतर फ्लाइटमध्ये बसलेल्या महिला पॅसेंजर्सकडे बोट दाखवून त्यांच्या फिगरबद्दल अश्लील भाषा त्याने वापरण्यास सुरुवात केली. 
> रॅन्डीने वेळीच फ्लाइट स्टाफला बोलावून त्याची तक्रार केली. तेव्हा स्टाफने रॅन्डीला दुसरीकडे फ्लाइटच्या मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. ती जागेवरून उठतच होती, तेव्हा विचार केला 'हा माझी छेड काढतोय ना, मग मी का उठू..?' स्टाफला रॅन्डीने त्या व्यक्तीलाच दुसऱ्या ठिकाणी बसवण्याचे सांगितले. पण, त्याने उठण्यास नकार दिला. 
> यानंतर आणखी अश्लील भाषा आणि शिवीगाळ करत तो आपल्या प्रायव्हेट पार्टला टच करत होता. एवढेच नव्हे, तर तिला देखील टच करण्यास सांगत होता. यासंदर्भात तिने विमान कंपनीला देखील पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...