आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक : तुमच्यासोबत व नंतरही... युजर्सला आपला वारसदार नेमण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुकच्या साह्याने तुम्ही आपले विचार, फोटो मित्रपरिवारापर्यंत पोहोचवत असता; परंतु तुमच्या हयातीनंतर फेसबुक अकाउंटचे काय होईल? आतापर्यंत अशा प्रकारचे अकाउंट निष्क्रिय होत होते; पण फेसबुकने आता वारसदार निवडण्याची संधी दिली आहे. अर्थात त्यामुळे तुमचे अकाउंट तुमच्यानंतरही चालूच राहील.

आतापर्यंत फेसबुक युजरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे स्मारक तयार करणे किंवा त्याला लॉक करण्याची पद्धती होती. कोणीही त्यात लॉग इन करत होते. परंतु आता फेसबुकने अमेरिकेतील युजरला वारसदार निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार युजरला विशेष अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही त्याचा वारसदार फ्रेंड रिक्वेस्टला स्वीकारू शकेल. मृत्यूनंतर सजेस्टेड फ्रेंड म्हणून त्याचे नाव इतर कोणालाही सुचवले जाणार आहे, अशीही त्यात व्यवस्था करण्यात आली आहे. युजरच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांच्या भावना दुखावतील, असे काहीही केले जाणार नाही.

पुढे वाचा, अशा प्रकारे निवडा लिगसी काँटॅक्ट