आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी फेसबुक खर्च करणार २० हजार कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी पुढील दहा वर्षांसाठी सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सायंटिफिक टूल्स, आर्टिफिशियल चिप, ब्लड मॉनिटर्सची निर्मिती केली जाणार आहे. जेणे करून आजारावर वेळीच सहज उपचार करणे शक्य होणार आहे.
हृदयरोग, कर्करोग, संसर्ग व न्यूरॉलॉजिकल आजारांवरील उपचाराचा त्यात समावेश आहे. जगभरातील मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे. त्यांना दीर्घायू मिळावे, हा या अभियानाचा हेतू आहे. ही घोषणा मार्क झुकेरबर्ग व त्यांची पत्नी प्रिसिला चान यांनी नुकतीच केली आहे. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात बोलत होते. झुकेरबर्ग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शतकात सर्व प्रकारच्या आजारांचा नायनाट करणे शक्य होईल का, असा सवाल त्यांनी केला. मग म्हणाले, हेच आमचे ध्येय आहे. विज्ञानाच्या इतिहासाचे अवलोकन करा. बघा. वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळेच सर्वाधिक बदल घडून आले आहेत.

गेल्या ५० वर्षांत जगात पोलिआेसारखा आजार संपला आहे. टेलिस्कोपने खगोलशास्त्र व ब्रह्मांड जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. मायक्रोस्कोपने पेशी व बॅक्टेरियाला समजून घेणे शक्य झाले. सर्वाधिक मृत्यू उपचाराच्या अभावी होते. म्हणूनच अत्याधुनिक उपकरण व संशोधनातून चांगले व दीर्घायुष्य जगता येऊ शकते, असे झुकेरबर्ग म्हणाले. पत्नी प्रेसिला बोलू लागताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आेघळू लागले. मी अनेक कुटुंबांसोबत काम केले आहे. प्रसूतीदरम्यान त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते, हे बघितले आहे.

चान-झुकेरबर्ग यांचा पुढाकार पहिली गुंतवणूक ४०० कोटींचे ‘बायोहब’
चान-झुकेरबर्ग यांनी उचललेले पहिले सर्वात मोठे पाऊल म्हणून बायोहबकडे पाहता येईल. यावर सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. प्रकल्पाला बायोहब असे नाव देण्यात आले आहे. स्टॅनफोर्ड, बर्केले, कॅलिफाेर्निया विद्यापीठातील संगणक वैज्ञानिक, अभियंते, जीवशास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. ते आजारांशी मुकाबला करण्यासाठी साधनांची निर्मिती करतील. शास्त्रीय संशोधनासाठी निधीची व्यवस्था करण्यात येईल. दुसरे ध्येय तंत्रज्ञानात बदल आणणे आहे. बायोहब सुरुवातीला दोन योजनांवर काम करेल. पहिला-सेल एटलस मॅप असेल. त्यात शरीरातील पेशीतील कोशिकांचे वर्णन असेल. त्यावरच प्रमुख अवयवांचे नियंत्रण अवलंबून आहे. दुसरा संसर्गजन्य रोगांवरील नियंत्रणासंबंधीचा टप्पा असेल. हा निधी चान-झुकेरबर्ग फंडातून दिला जाईल. डिसेंबर २०१५ मध्ये चान-झुकेरबर्ग फंडाची स्थापना झाली होती.
बातम्या आणखी आहेत...