आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts About Jaish E Mohammed, Group Behind Pathankot Attack

#pathankot हल्ल्यात हात असलेल्या 'जैश ए मोहम्मद'ला दाऊद पुरवायचा पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोटच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला करून 50 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. तरीही लष्कराची शोधमोहीम सुरुच आहे. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. हल्ल्यातील दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. जैश ए मोहम्मद या संस्थेला एकेकाळी दाऊदही पैसा पुरवत होता अशी माहिती मिळाली आहे.

या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानच्या द्विपक्षीय नातेसंबंधांमध्ये आणखी दुरावा येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र या हल्ल्याने आणखी एका दहशतवाद्याकडे लक्ष वेधले गेले. तो म्हणजे 2001 च्या संसद हल्ल्यामध्ये सहभागी असलेला जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर. भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचे अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर गेल्या काही दिवसांत चांगले संबंध निर्माण होण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक घटना घडल्या होत्या. पण या दोन देशांचे संबंध कधीही सुधारू नये यासाठी जैश सारख्या काही संघटना अशा प्रकारचे अडथळे निर्माण करत अशल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात, या हल्ल्याचा संशय असलेल्या जैश ए मोहम्मद आणि संघटनेच्या म्होरक्याबाबत...