आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts Abouts The Worlds Most Secretive Country North Korea

या गोष्‍टींची काळजी घ्‍या, नाहीतर उत्तर कोरियात जीवाचे बरेवाईट होऊ शकते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाने बुधवारी(ता.सहा) पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे देशातील काही भाग भूकंपाने हादरवला होता. कोरियन नेता किम जोन्ग ऊनचे समर्थक त्यांच्या नेत्याला हवे तसे आपला देश जगाला दाखवतात. अशा स्थितीत येथील नियम-कायद्यांची माहिती न घेता या देशात जाणे पर्यटकांना महागात पडू शकते.
अमेरिकेने दिला आहे इशारा...
अमेरिकेच्या परराष्‍ट्र विभागाने आपल्या संकेतस्थळावर उत्तर कोरियात जाणा-या पर्यटकांना इशारा दिला आहे. डीपीआरकेचे नियम न पाळणा-या पर्यटकांना अटक केली जाते, याबाबत अमेरिकेने पूर्व कल्पना दिली आहे. अनेकदा जबरदस्त दंडही वसूल केले जाते. यात परवानगी नसलेल्या ठिकाणी छायाचित्रे काढणे, खरेदी करणे, चलन बदलणे आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांचा अपमान या सारख्‍या गोष्‍टींचा समावेश आहे.
चित्रविचित्र आहे या देशातील कायदे-नियम...
उत्तर कोरियाविषयी खूप कमी लोकांनी माहिती आहे. वास्तविक, हुकूमशहा शासन व्यवस्था असलेल्या या गुढ देशात दररोज येण्‍यास परवानगी नाही. येणा-या पर्यटकालाही एका दिखावू वातावरणात ठेवले जाते आणि त्यांच्यावर अनेक निर्बंध असतात. येथे आम्ही उत्तर कोरियाशी संबंधि‍त काही अशाच गोष्‍टी सांगणार आहोत, जी माहिती असणे आवश्‍यक आहे.
1. उत्तर कोरियात पर्यटकांना गाईडशिवाय फिरण्‍यास मनाई आहे. डीआरपीकेने दिलेली दोन गाईड नेहमी पर्यटकांसह असतात.
2. अमेरिका आणि इस्रायलच्या पर्यटकांना उत्तर कोरियात येण्‍यास कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. मात्र ते रेल्वेने देशात प्रवेश करु शकत नाहीत. त्यांना विमानानेच देशात येतो येईल आणि जाता येईल.
3. येथे येणा-या पर्यटकांनी येथील परंपरा आणि सणांचा आदर करावा. स्मारके आणि पवित्र ठिकाणांना भेट देताना कपड्यांबाबत सल्ला दिला जातो. माजी हुकूमशहांची समाधीजवळ जायला टी-शर्ट, जीन्स, शॉर्ट्स आणि मिनी स्कर्ट परिधान केलेल्यांना जाण्‍यास बंदी आहे.
4. पर्यटक एकटे हॉटेल सोडून बाहेर पडू शकत नाही. गाईडबरोबर हॉटेलच्या बाहेर पडण्‍यास परवानगी आहे.
5. सैनिक हुकूमशहाचे नियम पाळतात. दोषी व्यक्तीच्या तीन पिढ्यांना शिक्षा भोगावी लागते.
6. प्योंगयांग शहराच्या काही हॉटेल सोडल्यातर येथे इंटरनेट सुविधा मिळू शकत नाही. या शहरात 2007 मध्‍ये पर्यटकांसाठी ईमेलची सुविधा सुरु केली गेली. जर मेल करायचा असेल तर संबंधिताला हॉटेलच्या अकाउंटवरुन पाठवावा लागतो. यासाठी संदेशाच्या आकारानुसार रक्कम चुकवावी लागते.
7. उत्तर कोरियाच्या प्रवासात पर्यटकबरोबर मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ शकत नाही.
8. पर्यटक या देशात स्थानिक चलनाचा वापर करु शकत नाही. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार अमेरिकन डॉलर, युरो आणि चिनी युआनमध्‍ये केली जातात.
9. पर्यटकांना प्योंगयांगमध्‍ये सर्व ठिकाणी छायाचित्रे काढण्‍यास स्वातंत्र्य नाही. ते गाईडच्या परवानगीने काही ठिकाणांची छायाचित्रे काढू शकतात.
10. कोरियात येणा-या बहुतेक पर्यटकांना कोर्यो हॉटेलमध्‍ये थांबवावे लागते. दोन मनोरे असलेल्या 45 मजली या इमारतीत प्योंगयांगमध्‍ये तायदेंग नदीच्या एका बेटावर बनवले आहे. रात्री बेटाला जोडलेली सर्व मुख्‍य रस्ते बंद केली जातात.
11. येथे वर्तमानपत्रेही वाचाण्‍यास सहजासहजी मिळत नाही. यासाठी रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर वृत्तपत्रे उपलब्ध करुन दिली जातात.
12. उत्तर कोरियन शासनाने दक्षिण कोरियाच्या सीमेवर प्रोपोगेंडा सिटी बनवले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गूढ राष्‍ट्र असलेल्या उत्तर कोरियाची काही छायाचित्रे...