आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्ष लढले गेले होते व्हिएतनामचे युद्ध, ठिकठिकाणी होते मृतदेहांचे ढिग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएतनाम युद्धाला भलेही चाळीस वर्ष उलटून गेले असतील परंतु या युद्धाच्या भयावह आठवणी मनामध्ये आजही जिवंत आहेत. व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियाच्या भूमिवर सुमारे 20 वर्ष हे युद्ध लढले केले. हे युद्ध नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाममध्ये झाले.

युद्धात पहिल्यांदा उतरले अमेरिकन सैन्य
- डिसेंबर 1956 पासून एप्रिल 1975 पर्यंत हे युद्ध चालले.
- या युद्धात अमेरिका खऱ्या अर्थाने 9 फेब्रुवारी 1965 रोजी उतरली.
- 1969 मध्ये या युद्धाने गंभीर स्वरुप प्राप्त केले होते.
- या युद्धात व्हिएतनामच्या जनतेची अपरिमीत नुकसान झाले. कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले.
- उत्तर व्हिएतनामच्या बाजूला कम्युनिस्ट समर्थक देश होते तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिकेसारख्या कम्युनिस्ट विरोधी देश होते.
- उत्तर व्हिएतनामचे नेतृत्व हो ची मिन्ह करीत होते.

बॅकफूटवर गेली अमेरिका
1969 मध्ये या युद्धाने गंभीर स्वरुप प्राप्त केले होते. अमेरिकेने चक्क पाच लाखांचे लष्कर या युद्धात उतरवले होते. परंतु, नित्याच्याच हिंसाचाराने त्रस्त झालेल्या अमेरिकी जनतेने सरकारवर दबाव निर्माण केला. शिवाय व्हिएतनाम झुकण्यास तयार नव्हता. अखेर अमेरिकेने परत जाण्याचा निर्णय घेतला. एखादे युद्ध न जिंकता तेथून माघार घेण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ होती.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने आम्ही येथील इतिहास परंपरा आणि ठिकाणांशी संबंधित माहिती देत आहोत.)
पुढील स्लाईड्सवर पाहा, व्हिएतनाम युद्ध काळातील फोटो...
बातम्या आणखी आहेत...