आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरातून ISIS च्या दहशतवाद्यांना पिटाळून लावले, पाहा हिंसक युध्‍दाचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराकच्या आर्मीने फल्लुजाह शहर इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) नियंत्रणातून मुक्त करण्‍यात आले आहे. दहशतवाद्यांनी 2014 मध्‍ये इराकच्या या शहरासह बराच भाग आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र गेल्या एक महिन्यापासून इराकी आर्मी व दहशतवाद्यांमधे घमासान युध्‍द सुरु होते. विजयानंतर आर्मीने देशाचा झेंडा फडकवून व हवेत गोळीबार करुन जल्लोष साजरा केला. शहरात शोधले जात आहे बॉम्ब व ट्रॅॅप...
- दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्‍ठ कमांडर लेफ्टीनन्ट जनरल अब्दुल वहाब अल सादीने या विजयाची घोषणा केली.
- दहशतवाद्यांपासून फल्लुजाह सोडवण्‍यासाठी आर्मी गेल्या महिन्यात येथे दाखल झाली होती.
- शहराचे शेवटचे टोक अल-जुलानवर नियंत्रण मिळवल्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला.
- आर्मी आता बॉम्ब व ट्रॅप हटवण्‍याचे काम करत आहे. दहशतवाद्यांनी हे शहरात लपवले आहे.
- पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी फल्लुजाहच्या स्वातंत्र्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.
- त्यावेळी आर्मी फल्लुजाहच्या मध्‍यवर्ती भागात शिरली होती व सरकारी संकुल आपल्या कब्जात घेतले होते.
लाखो लोकांना घर सोडावे लागले होते
- संयुक्त राष्‍ट्रसंघाच्या (यूएन) रिफ्युजी एजन्सीने म्हटले, की हिंसेमुळे गेल्या महिन्यात 85 हजार लोकांनी शहर सोडले होते.
- यूएन एजन्सीनुसार, दहशतवाद्यांमुळे पूर्ण इराकमधून 33 लाख लोकांनी घर सोडले होते.
- त्यावेळी तापमान 40 डिग्री सेल्सिअस होते व शेल्टर हाऊस खूप कमी होते.
- यापूर्वी या भागात दहशतवादी संघटना अल कायदामुळे अनेक लोकांनी जीव गमावला होता.
- 2004 मध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना अमेरिकेचे 100 जवानांचा मृत्यू झाला व एक हजारांपेक्षा जास्त जखमी झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...